आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराबवाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, गॅस गळती झाल्याने पहाटे घडली दुर्घटना; एकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाकण : चाकणजवळील खराबवाडीत पहाटे पाचच्या सुमारास घरातील सिलेंडचा स्फोट झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांगीलाल चौधरी असे मयताचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील घटना चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी येथे गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. घरात गॅसची गळती झाल्यानंतर शेजारील किराणा दुकानदार भाजीपाला आणण्यासाठी उठवायला गेला. दरम्यान लायटरने सिगारेट पेटवताच मोठा स्फोट झाला. स्फोट होताच उठवायला आलेला माणून जोराने भिंतीवर फेकला गेला आणि जागीच मृत्यूमुखी पडला. मांगीलाल चौधरी (वय 35 वर्ष) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ओमप्रकाश लोहार हा व्यक्ती जखमी झाला आहे. 

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दुर्घटनेत घरांच्या खिडक्या निखळल्या. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले. स्वयंपाकघरातील लादी लोहार ओमप्रकाश यांच्या अंगावर पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.