आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बाब.. असे झाल्यास एजन्सी परत करेल पूर्ण चार्ज, हक्काचे पैसे परत घ्यायला विसरू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - पेट्रोलियम मंत्रालय होम डिलिव्हरी न देता त्याचा चार्ज वसूल करणाऱ्या गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गॅस एजन्सीज तुमच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवण्याचा चार्ज वसूल करतात. सिलिंडरच्या किमतीबरोबर हा चार्ज वसूल केला जातो. जर तुम्ही स्वतः गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून सिलिंडर आणत असाल तर एजन्सी तुमच्याकडून डिलिव्हरी चार्ज वसूल करू शकत नाही. नियमानुसार ग्राहकांनी डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन स्वतः सिलिंडर घेत असतील तर त्यांच्याकडून डिलिव्हरी चार्ज वसूल करता येऊ शकत नाही. त्याशिवाय गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इंश्योरन्सचा अधिकारही मिळाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, लोकांनी डिलिव्हरी चार्जचा हक्काचे पैसे परत घेणे विसरता कामा नये. या प्रक्रियेची माहिती आम्ही देत आहोत. 


असे परत घेऊ शकता पैसे 
- पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते, गॅस सिलिंडरच्या किमतीत होम डिलिव्हरी चार्जचे 20 रुपयेदेखिल असतात. पण तुम्ही गॅस एजन्सी किंवा गोडाऊनमधून स्वतः जाऊन सिलिंडर आणले तर ते 20 रुपये परत मिळू शकतात. 
- एखाद्या एजन्सीने पैसे परत केले नाही तर त्याची तक्रार करता येते. तसे झाल्यास संबंधित एजन्सीला दंड होऊ शकतो. 
- 3 पेक्षा जास्त तक्रारी मिळाल्यास परवाना होऊ शकतो रद्द. 


प्रत्येक ग्राहकाचा 50 लाखांचा इंश्युरन्स 
प्रत्येक एलपीजी ग्राहकाचा 50 लाखांपर्यंतचा विमा असतो. त्यासाठी ग्राहकाला अतिरिक्त हप्ता भरावा लागत नाही. एलपीजी सिलिंडरमध्ये तुमच्या घरात अपघात झाला तर तुम्हाला 40 लाखांपर्यंतचा इंश्युरन्स क्लेम करता येतो. सिलिंडर ब्लास्टमुळे मृत्यू झाल्यास 50 लाखांपर्यंतचा क्लेम करता येतो. जखमी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. 


ऑटोमॅटिक होतो इंश्युरन्स 
- नवे कनेक्शन घेतल्यास विमा आपोआप मिळतो. कनेक्शन घेताना दिल्या जाणाऱ्या पैशात इंश्युरन्सच्या रकमेचा समावेशही असतो. 
- पेट्रोलियम कंपन्यांना याचा इंश्युरन्स करावा लागतो, त्या माध्यमातून अपघात झाला तर कंपनी पीडित व्यक्तीला पैसे देते. 
- काही अपघात झाला असेल तर त्याबाबत लगेचच पोलिस आणि इंश्युरन्स कंपनीला माहिती दिली जाणे गरजेचे आहे. तरच याचा फायदा होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...