आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदना आणि ब्लीडिंगनंतर केले गर्भवतीचे सिझेरियन, अर्ध्या तासाने डॉक्टरने सांगितलेले ऐकूण बसला Shock

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोट दुखत असल्यामुळे डॉक्टरने एका महिलेवर उपचार करण्याऐवजी थेट तिचे सिझेरियन ऑपरेशन केले. डॉक्टर नंतर नातेवाईकांना म्हणाले, पोटात बाळ नाही तर गॅस असल्याने पोट दुखत होते. डॉक्टरचे म्हणणे ऐकूण नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी डॉक्टरवर बाळ गायब केल्याचा आरोप केला आहे. विजयकांत मिश्रा यांची मुलगी काजलला पोट दुखत असल्याने दवाखान्यात आणले होते. ती प्रेग्नंट असल्याचे नातेवाईक म्हणाले. 


डॉक्टर म्हणाले पोटात बाळ नव्हे, गॅस होता.. 
महिला यासाठी दोन महिन्यांपासून माहेरी राहून उपचार घेतल होती. तिचे अल्ट्रासाऊंडही झाले होते. ती गर्भवती असल्याचे समजून उपचार सुरू होता. एचानक पोटात वेदना आणि ब्लीडींग सुरू झाल्याने तिला खासगी दवाखान्यात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी सिझेरियन करावे लागणार असल्याचे म्हटले. त्यासाठी शहरातील आमच्या हॉस्पिटलला न्यावे लागेल असे सांगितले. नंतर त्याठिकाणी नेऊन त्यांचे ऑपरेशन केले. अर्ध्या तासान बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या पोटात बाळ नव्हे तर गॅस होता. 


काय म्हणाले, डॉ. आशुतोष.. 
प्रश्न
- गर्भवतीच्या सिझेरियननंतर बाळ गायब झाल्याचे म्हटले जात आहे? 
उत्तर - पोटात बाळ नव्हतेच तर बाळ कुठून येणार. हे आरोप निराधार आहेत. 

प्रश्न- बाळ नव्हते तर सिझेरीयन का केले. 
उत्तर- महिलेला प्रचंड वेदना होत्या. ब्लिडींग होत होते. नातेवाईक म्हणाले ऑपरेशन करा म्हणून सिझेरियन केले. 

प्रश्न-तुम्ही सिझेरियनपूर्वी अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहायला नको होता का?
उत्तर-आधी रुग्णाचा जीव वाचवणे गरजेचे नव्हते का. 

प्रश्न- बाळाची आई बाळ गायब केल्याचा आरोप करत आहे? 
उत्तर - हे अगदी खोटे आणि निराधार आहे. अल्ट्रासाऊंड मध्येही बाळाचा उल्लेख नाही. मी चौकसीसाठी तयार आहे. 

 

आई म्हणाली, बाळ पाहिले होते 
सिझेरियननंतर काजल म्हणाली की, ऑपरेशननंतर शुद्धीत आली तेव्हा बाळ तिच्याजवळ होते. पण डॉक्टरांनी लगेचच एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काय झाले ते समजले नाही. शुद्ध आली तेव्हा मी पाहिलेले बाळ गायब झाले होते. मात्र एका महिन्यापूर्वी अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये बाळाचा उल्लेख नाही, त्यामुळे ती खोटे बोलत असल्याचा संशय आहे. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, काजलचे पोट पूर्णपणे फुगलेले होते. जर बाळ नव्हतेच तर ऑपरेशन तरी का केले. 


9 महीने घेतली ट्रिटमेंट 
विवाहित महिला रोहतासमधील आहे. 9 महिन्यांपूर्वी पोट दुखत असल्याने ती उपचार घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरने तिला गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती माहेरी आली. वेळोवेळी औषधे घेत राहिली. पण माहेरी आल्यानंतर उपचारादरम्यान तिच्या पोटात बाळ नसल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. तरीही ती गर्भवती असल्याचेच सांगत राहिली. 

बातम्या आणखी आहेत...