आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्जनस्थळी सिलिंडरमधून करायचे गॅस चोरी, चौघे जण जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पंचवटी : भरलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या बिडी कामगार नगरच्या चार संशयितांना सिलिंडरमधून गॅस ट्रान्सफर करताना रंगेहात अटक करण्यात आली. रविवारी (दि. ३) आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून गॅस सिलिंडर टाक्या, टेम्पो असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक विडी कामगारनगर परिसरात गस्त करत असताना गंगोत्री विहार भागात रोडवर चार संशयित मालवाहू टेम्पोमधील सिलिंडर रस्त्यावर ठेवत लोखंडी पाईपने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचे निदर्शनास आहे. पथकाने संशयितांना जागेवरच पकडले. चौकशीत राजेंद्र गजेंद्र मोहिते, गजानन कैलास ढाले, मधुकर तुकाराम कोसे, आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते (सर्व रा. विडी कामगारनगर) अशी नावे समजली. पथकाने टेम्पो (एमएच १५ इजी ४७७९), सहा रिकामे सिलिंडर, १९ भरलेले सिलिंडर, वजन काटा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली, सहायक निरीक्षक योगेश पाटील, मुनीरोद्दीन काझी, विनोद लखन, विजय सूर्यवंशी, वाल्मीक पाटील, नकुल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


निर्जनस्थळी गॅस चोरी 
संशयित एका गॅस वितरक कंपनीमध्ये गॅस सिलेंडर वितरीत करतात. निर्जन स्थळी टेम्पो उभा करुन भरलेल्या गॅस मधून रिकाम्या टाकीमध्ये गॅस ट्रान्सफर केले जातात. या टाक्या व्यावसायिकांना काळ्या बाजारात विक्री केल्या जातात. संशयिताकडून टाकी विकत घेणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांनी सांगीतले. 
 

बातम्या आणखी आहेत...