आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गश्मीर महाजनी-पूजा सावंत देणार प्रेक्षकांना ‘बोनस’ची ट्रीट, नव्या जोडीचा चित्रपट 'या' तारखेला होणार रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक गश्मीर महाजनी आणि गॉर्जिअस पूजा सावंत लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘बोनस– अॅवॉर्ड फॉर ऑडेसिटी’  या आगामी चित्रपटातून हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकताच यांच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले.  गश्मीर आणि पूजा या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत असून हा चित्रपट रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. हे दोघेही या पार्श्वभूमीवर अगदी रोमँटीक अशा पोजमध्ये दिसत आहेत. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

'चित्रपटाच्या नावावरून ध्वनीत होते त्याप्रमाणे ही कथा धैर्य आणि धाडसाची तसेच धुंडाळलेल्या वेगळ्या पायवाटेची आहे. आम्ही याआधीच्या चित्रपटांमधून भक्कम कथा आणि उत्तम कलाकारांची जी परंपरा निर्माण केली आहे, ती या चित्रपटामधून अधोरेखित होईल,' असे ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार म्हणाले. ‘बोनस– अॅवॉर्ड फॉर ऑडेसिटी’ या चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा आहे ती या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे. गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.