आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळवण तालुक्यातील सावरपाडा गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ, दोघांचा मृत्यू 18 गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावरपाडा गावात मराठी शाळेत सुरु केलेल्या तात्पुरत्या आरोग्य केंद्रात झालेली गर्दी - Divya Marathi
सावरपाडा गावात मराठी शाळेत सुरु केलेल्या तात्पुरत्या आरोग्य केंद्रात झालेली गर्दी

नाशिक- जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सावरपाडा गावात दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे तब्बल 100 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली असून उपचारादरम्यान पंढरीनाथ अर्जुन बर्डे(75), चंद्रा तान्हू ठाकरे (70) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

सावरपाडा गावात आज(17 ऑक्टोबर) रात्री 1 वाजेच्या दरम्यान नागरिकांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णांनी सकाळच्या सुमारास जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास सुरवात केली. या दरम्यान रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे लक्षात येताच आरोग्य यंत्रणेने सकाळी 11 च्या सुमारास 8 वैद्यकीय अधिकारी व 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सावरपाडा गाव गाठले व रुग्णांना सावरपाडा गावातील मराठी शाळेत प्राथमिक उपचार सुरु केले. तसेच गंभीर 20 रुग्णांवर उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यापैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 18 रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शकुंतला भोये (50) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पुनंद धरणातून सटाणा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम सुरु आहे. या ठिकाणी सावरपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे. पाईपलाईनचे खोदकाम सुरु असतांना पाणीपुरवठा योजनेचे पाईप तुटले होते. सदर पाईप सटाणा पाइपलाइनचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाकरून जोडले आहेत. हे पाईप तुटलेले असतांना यात घाण पाणी गेले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...