आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक आंध्र, मध्य प्रदेशासाठी जालन्यातून 'स्लीपर सेल'च्या मदतीने गुटख्याची तस्करी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - वर्षाला दीड ते दोन कोटींपर्यंत गुटखा पकडल्याच्या कारवाया जालना पोलिसांकडून झाल्या आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधून येणारा गुटखा वितरित करण्यासाठी जालना हे केंद्रबिंदूच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. दरम्यान, पोलिसांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता गुटखामाफियांनी आता गुटखा परराज्यात पार्सल करण्यासाठी दहशतवादी कारवायांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या 'स्लीपर सेल'चा वापर करून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. 

 

राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरासह पानटपऱ्या, किराणा दुकानांच्या ठिकाणी ओळखीच्या ग्राहकांना सर्रास गुटखा मिळतो. चोरटी वाहतूक करून आणलेला हा गुटखा चोरट्याच पद्धतीने विक्री केला जात आहे. चार वर्षांच्या काळात पोलिस व अन्न औषधी प्रशासनाकडून बारा कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतून येणारा गुटखा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असलेल्या जालन्यातून इतर जिल्ह्यात वितरित होत आहे.

 

महाराष्ट्राची विकसनशील राज्य म्हणून ओळख आहे. त्यातल्या त्यात जालना जिल्हा हा तिन्ही राज्यांच्या मध्ये आलेला आहे. जळगाव, सोलापूर, नागपूर या मुख्य शहरांच्या ठिकाणांमुळे विविध वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, अन्न औषधी प्रशासनाकडून कारवाया केल्या जात आहेत.

 

परंतु या कारवायांच्या प्रमाणात बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे, पानटपऱ्या, किराणा दुकान, हॉटेलच्या ठिकाणी सर्रास गुटखा मिळत असल्यामुळे हे नेटवर्क अजूनही चांगलेच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मध्यरात्री गोवा कंपनीचा २६ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा गुटखा तर ७ लाख रुपये किमतीचा ट्रक असा ३३ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जालन्यात सुरू असलेले अनधिकृत गुटखा कारखानाही विभागीय अन्न व औषधी प्रशासनाने उघड केला आहे.

 

या कारवाईत यंत्रसामग्री व तंबाखूजन्य पदार्थ मिळून दीड कोटीचा माल जप्त करण्यात आल्याच्या या कारवाईने खळबळ उडाली होती. गुरुवारी करण्यात आलेली कारवाई अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शीलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल वाघ, भरत कडुळे, प्रदीप घोडके, विशाल काळे, बाबासाहेब खरात यांनी केली. जप्त केलेला गुटखा अन्न व औषधी विभागाकडून जाळण्यात आला आहे. 


असे आहे स्लीपर नेटवर्क : कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशकडून ट्रक, टेम्पो, आयशर या वाहनांमधून गुटखा नेत असताना अनेक ठिकाणी चालक बदलत असतात. यात चालकालाही वाहनात काय माल आहे याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. हे स्लीपर हा माल वाहतूक करताना जास्त करून रात्रीच्या वेळेसच पार्सल करत असल्याचे समोर आले आहे. 


यांनी जाळला गुटखा 
जप्त केलेला गुटखा एका खाजगी कंपनीत अन्न औषधी विभागाचे सहायक आयुक्त एस. ई. देसाई, वर्षा रोडे, संजय चट्टे, निखिल कुलकर्णी, शहरातील चंदनझिऱ्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील इंगळे यांच्या उपस्थितीत जाळण्यात आला. जप्त केलेला गुटखा जाळून नष्ट करतांना अन्न औषधी विभागाचे अधिकारी. 


जप्त केलेला गुटखा एफडीएच्या ताब्यात 
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईत ताब्यात घेतलेला गुटखा हा अन्न औषधी प्रशासनाकडे देण्यात आला आहे. बाळासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, चंदनझिरा. कारवाया सुरू 
विविध गुन्ह्यांबाबत कारवाया सुरू आहेत. आगामी काळातही कारवायांवर भर दिला जाणार आहे. विविध गुन्ह्यांसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. समाधान पवार, अपर पोलिस अधीक्षक, जालना

बातम्या आणखी आहेत...