आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटीज आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच या मुद्द्यावर मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खाननेदेखील आपले मत मांडले. तिने ट्विटरद्वारे काश्मीरच्या लोकांसाठी चिंता व्यक्त केली आणि 370 रद्द केल्याबद्दलही प्रश्न विचारला.
आत्मविश्वास कसा देऊ शकता - गौहर...
गौहरने ट्वीट मध्ये लिहिले, 'आपल्या देशातील सुमारे 80 लाखपेक्षा जास्त जनता बाहेरच्या जगाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करू शकत नाहीये. कलम 370 रद्द करण्याचे आणि काश्मीरला आपल्या सोबत मिळवून घेण्याचे हेच खरे कारण होते का ? काश्मीरच्या संपूर्ण जनतेला संपर्करहित बनवून आपण त्यांना एकत्र आणण्याचा आत्मविश्वास कसा देऊ शकतो.'
गौहर खानचे ट्वीट...
भारत सरकारकडे केली होती विशेष अपील...
यापूर्वीही गौहरने जम्मू आणि काश्मीरमध्ये संचार सुविधा बंद केल्याबद्दल ट्वीट केले होते. तिने आपल्या ट्वीटमध्ये भारत सरकारला निवेदन करत पूर्ण राज्यात संचार सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
गौहर खानचे ट्वीट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.