आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते मोहनीश बेहेल यांच्या एग्झिटनंतर आता 'संजीवनी' मध्ये होणार गौरव चोप्राची एंट्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मोहनीश बहल यांनी टीव्ही मालिका 'संजीवनी' सोडली आहे. या मालिकेत आता तीन वर्षांचे लीप घेण्यात आले आहे. यात गौरव चोप्राची एंट्री झाली आहे. आधीची स्टारकास्ट तशीच ठेवण्यात आली आहे. यात अभिनेत्री सुरभी चंदना प्रेमाच्या शोधात असणार आहे. गौरव तिच्या प्रियकराची भूमिका साकारणार आहे. आधी सुरभीसोबत नमित खन्ना मुख्य भूमिकेत होता. मात्र आता, मात्र त्याचे सुरभीच्या पात्राशी ब्रेकअप झाले आहे.

निर्माते सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी सांगितले...

आम्हाला ईशानी (सुरभी चंदना) साठी एका अभिनेत्याची गरज होती. त्यासाठी आम्ही गौरवला घेतले. तो ईशानीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. त्यामुळे ईशानी ब्रेकअपच्या दुखातून बाहेर येऊ शकेल. यात गौरवचे पात्र उच्चशिक्षित आणि श्रीमंत कुटंुबातील असते. तो एक गुंतवणूकदार आणि संजीवनी हॉस्पिटलचा मालक असतो.

बातम्या आणखी आहेत...