आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss हा विनर शोमध्ये ठरला होता प्रचंड वादग्रस्त.. लव्ह स्टोरीमुळेही झाली Controversy

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्हीवरली सुपरहिट रियालिटी शो बिग बॉसच्या 12 व्या सिझनची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या घरामध्ये सध्या तरी एकच कपल दिसत आहे आणि ते म्हणजे अनुप जलोटा आणि जसलिन. पण बिग बॉसचे हे घर जोड्या बनवण्यासाठी फेमस आहे. या घरात गाजलेली अशीच एक जोडी म्हणजे डियांड्रा सोरेस आणि गौतम गुलाटी यांची. मग घरातील त्यांचे एकमेकांच्या जवळ येणे असो किंवा डियांड्रा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा असो. एकूणच गौतम गुलाची त्या पर्वातील वादग्रस्त कंटेस्टंट ठरला होता आणि विनरही. 


करिश्मा तन्नाविषयी अभद्र शब्दांचा वापर-
'बिग बॉस'च्या सुरुवातीलाच गौतम आणि करिश्मा यांच्यात जोरदार भांडण झाले होते. 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना लग्जरी बजेट टास्क दिला होता. यावेळी गौतम चेअरवर बसलेला होता आणि करिश्मा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी गौतम उठला नाही म्हणून करिश्माने त्याच्या तोंडावर मिरची पावडर फेकली. गौतम या कृत्या करिश्मावर ओरडला. एवढेच नव्हे, गौतमने करिश्माविषयी अपशब्दांचा वापरदेखील केला होता. त्यामुळे दोघांत जोरदार भांडण झाले होते. मात्र काही दिवसांनी गौतमने करिश्माची माफी मागितली होती.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गौतम गुलाटीच्या संबंधित वाद...


 

 

बातम्या आणखी आहेत...