आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीकडे कठोर परिश्रमासोबत धैर्य असायला हवे, अन्यथा यश मिळणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अनेक प्रसंग आहे. या प्रसंगांमध्ये सुखी जीवन आणि यश प्राप्तीचे सुत्र लपलेले आहेत. या सुत्रांचा जीवनाच अवलंब केला तर आपण अनेक अडचणींपासून सावरू शकतो. तसेच आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो. आम्ही तुम्हाला असाच एक प्रसंग सांगत आहोत. यामध्ये जीवनामध्ये यशस्वी कसे व्हायचे ते सांगतिले आहे

.

> प्रचलित प्रसंगांनुसार एकदा गौतम बौद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावात उपदेश करण्यासाठी जात होते. गावी पोहोचण्यापूर्वी त्यांना वाटेत ठिकठिकामी खड्डे खोदलेले दिसले. 

> महात्मा बुद्ध यांचा एक शिष्य त्या खड्ड्यांकडे पाहून त्या खड्ड्यांचे रहस्य काय असेल याबाबत विचार करू लागला. त्याने आपल्या गुरुला विचारले की तथागत मला खड्ड्यांचे रहस्य सांगा. एकाचवेळी इतके सगळे खड्डे कोणी आणि का खोदले असतील? 

> गौतम बुद्धांनी शिष्याला उत्तर दिले की, एखाद्या व्यक्तीने पाण्याच्या शोधात इतके सगळे खड्डे खोदले आहेत. जर त्याने धैर्यपूर्वक एकाच ठिकाणी खड्डा खोदला असता तर त्याला अवश्य पाणी मिळाले असते. पण तो थोडा वेळ खड्डा खोदायचा आणि पाणी न मिळल्यास दुसऱ्या ठिकाणी खड्डा सुरु करत होता. यामुळे त्याला कधीच पाणी मिळाले नाही. 


गोष्टीची शिकवण
तथागतांनी शिष्यांना समजावले की, व्यक्तीला जर आपल्या कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रण घ्यावे लागतात. पण कठोर परिश्रमासोबत धैर्य असणे महत्वाचे आहे. कधी-कधी अधिक काळापर्यंत परिश्रम घेतल्यानंतर आपल्याला यश मिळते. अशा स्थितीत आपण धैर्य ठेवायला हवे. अन्यथा यश मिळत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...