आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-PAK हाय व्होल्टेज मॅचपूर्वी पाक अँकरने उडवली टीम इंडियाची खिल्ली, गंभीरने केली बोलती बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दुबईत होत असलेल्या एशिया कप 2018 मध्ये आज भारत पाकिस्तान दरम्यान बुधवारी 19 सप्टेंबरला हाय व्होल्टेज मॅच होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानच्या या मॅचची सर्वांनाच उत्सुकता आहे. या मॅचपूर्वी वातावरण एवढे तापले आहे की, टीव्ही डिबेट्समध्येही त्याचा परिणाम झळकतोय. अशाच एका टीव्ही डिबेटमध्ये भारताचा फलंदाज गौतम गंभीरने पाकच्या अँकरची बोलती बंद केली. हा अँकर टीम इंडियाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होता. 


अँकरने केला खिल्ली उडवण्याचा प्रयत्न 
दोन्ही देशांच्या दोन न्यूज चॅनलने आयोजित केलेल्या एका डिबेटमध्ये पाकच्या अँकरने भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी संघ नुकताच झिम्बाब्वेला पराभूत करून आला आहे तर भारत इंग्लंडमधून पराभूत होऊन आला आहे, असे या अँकरने म्हटले त्यावर गंभीरने म्हटले की, इंग्लंडकडून पराभूत होणे आणि झिम्बाब्वे कडून जिंकणे यात खूप फरक आहे. तुम्ही तुमची रँकिंग पाहा आणि आमची रँकिंग पाहा, अशा शब्दांत गंभीरने त्याला सुनावले. त्यावर पाक अँकरने म्हटले की, काही दिवसांपूर्वी भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. त्यावर गंभीरने त्याला सुनावत म्हटले, एका चॅम्पियन्स ट्रॉफीने काही होत नाही, त्यापूर्वी तुम्ही कधीही काहीही जिंकलेले नाही. आज संध्याकाळी दोन्ही देशांत ही हाय व्होल्टेज मॅच होत आहे. 


पाहा डिबेटमध्ये नेमके काय झाले...

 

THIS IS EPIC!!! 😂🔥
Gautam Gambhir shuts the Pakistani media with his savage replies! #INDvPAK pic.twitter.com/UAaNJ7vXJo

— Team Gautam Gambhir (@gautamgambhir97) September 18, 2018

 

बातम्या आणखी आहेत...