Home | Sports | From The Field | Gautam Gambhir hits century in last match of his career

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या गंभीरने करिअरच्या अखेरच्या मॅचमध्येही ठोकले शतक, केल्या एवढ्या धावा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:13 PM IST

अखेरच्या मॅचमध्ये गंभीरने असा कारनामा करून दाखवला जो सचिन सारख्या दिग्गजांनाही करता आला नाही.

 • Gautam Gambhir hits century in last match of his career

  स्पोर्ट्स डेस्क - भारताचा एकेकाळचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर निरोपाच्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. फिरोजशाह कोटलामध्ये आंध्रप्रदेशच्या विरोधात तिसऱ्या दिवशी 92 धावांपासून खेळ सुरू केल्यानंतर त्याने 163 चेंडूंमध्ये शतक ठोकले. गंभीरने 185 चेंडू खेळले. त्यात 10 चौकारांसह 112 रन केले. त्याच्या खेळीने या रणजी ट्रॉफीमद्ये दिल्लीची दावेदारी अधिक मजबूत बनली आहे. दिल्ली रणजी ट्रॉफी ग्रुप बी मैचमध्ये मजबूत स्थितीत पोहोचली आहे. गंभीर आखेरच्या मॅचमध्ये शतक करणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजालाही अखेरच्या मॅचमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.


  पहिल्या विकेटसाठी 100 हून अधिकची भागीदारी
  या सामन्यानंतर क्रिकेटला पूर्णपणे अलविदा करण्याचा निर्णय घेतलेल्या गंभीरने 163 चेंडूत 9 चौकार लगावले. गंभीरने हितेन दलालसह पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार ध्रुव शौरी (नाबाद 39) सह दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.


  सोशल मीडियाद्वारे केली होती निवृत्तीची घोषणा
  2007 आणि 2011 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा हिरो राहिलेल्या गौतम गंभीरने करिअरमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या. त्याने 4 नोव्हेंबरला सर्व फॉरमॅटच्या निवृत्तीची घोषणा केली होती. गंभीरने सांगितले होते की, फिरोजशाह कोटलामधील रणजी मॅच त्याचा अखेरचा सामना असेल.


  शेवटची इनिंग पाहण्यासाठी उपस्थित होती फॅमिली
  गंभीरची मैदानावरील अखेरची इनिंग पाहण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची पत्नी आणि दोन्ही मुलीही मैदानावर उपस्थित होत्या. गंभीर फलंदाजीला उतरला तेव्हा त्याची पत्नी नताशा भावूक झालेली दिसले. दोन वर्षांनी कोटलाच्या मैदानावर आल्याचे तिने सांगितले. गंभीर कोलकाता नाइटरायडर्सचा कर्णधार होता तेव्हा यापूर्वी ती आली होती. दोन मुलींनीही टाळ्या वाजवत वडिलांचा उत्साह वाढवला. गंभीरचे अनेक फॅन्स अजूनही त्यासाठी क्रेझी असल्याचे पाहायला मिळाले. एक जण तर गंभीरबरोबर सेल्फी घेण्यासाठी मैदानात घुसला पण सिक्युरीटी गार्डने त्याला बाहेर काढले.

 • Gautam Gambhir hits century in last match of his career
 • Gautam Gambhir hits century in last match of his career
 • Gautam Gambhir hits century in last match of his career

Trending