आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासचिन वाघ
नाशिक - सायनिक खतांच्या व औषधांच्या माऱ्यामुळे भाजीपाला अन् अन्नधान्यामध्ये रासायनिक मात्रा आढळून येत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ग्राहक सेंद्रिय भाजीपाल्याकडे वळत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना नियमित भाजीपाला खरेदी करावा लागतो. बाजारात जास्तीत जास्त सेंद्रिय भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी राजूरजवळील धामणवन या गावातील १४ महिलांनी एकत्रित येऊन कावेरी महिला बचत गटाच्या माध्यमातून गावरान बीज संकलित करून त्याची कमी दरात विक्री करीत आहे. या गटाकडे सध्या १२० प्रकारचे गावरान बियाणे उपलब्ध असून सेंद्रिय शेतीचा प्रसार करीत करून राज्यातील इतर महिलांसमोर आदर्श उपलब्ध केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणवन या गावातील सखुबाई धिंदले यांच्या अध्यक्षतेखाली उषा धिंदले, शशिकला धिंदले, ललिता धिंदले, कमल धिंदले, वाळाबाई दराडे, गंगू धिंदले, सीताबाई करवंदे, कविता भांगरे, सुगंधा करवंदे, कांदा धराडे, रुख्मिणी धराडे, सविता धिंदले, सुरेखा धिंदले या महिला एकत्रित येऊन ४ मे २०१७ रोजी गावरान बियाण्याची बँक तयार केली आहे.
बँकेत असलेले विविध बियाणे
ताबंडा कुळीथ, कोद्रा, रिठा, हरभरा, देवठाण बाजरी, भोपळा, घोसाळे, वरई, नागली, ताग, हिरडा, कोळपी भात, नामकुडई भात, गंुज, मका, पांढरी नागली, पांढरी गुंज,मूग, वाळुक, घेवडा, चक्की, काळे तीळ, लादे मूग, चवळी, पांढरा वाल, बाजरी, ज्वारी यासह आदी गावरान बियाणे या बँकेत उपलब्ध आहे.
सेंद्रिय शेतीचा प्रसार
सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे गावरान असलेल्या बियाणे कमी दरात विक्री करीत आहे. यासाठी बचत गटातील महिलांची मोठ्या प्रमाणात मदत होत आहे, असे गावरान बीज बँकेच्या अध्यक्षा सखुबाई धिंदले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.