आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुला पाहते रे'ची ईशा आता 'युवा डान्सिंग क्वीन'च्या रंगमंचावर, ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  तुम्हाला 'तुला पाहते रे ' ही मालिका आठवते आहे का? त्यातील ती गोड मुलगी जिने अतिशय जिद्दीने सर्व संकटाना तोंड देत विक्रांत सरंजामेवर मात केली. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-ईशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं होत. ईशा निमकर म्हणजेच सगळ्यांची आवडती गायत्री दातारने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. "दो रुपये भी बडी चीज होती है  बाबू" म्हणत छोट्या स्क्रीनवर आलेली गायत्री ही गोड अभिनेत्री आता प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. 11 डिसेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रोज रात्री 9.30 वाजता सुरु होणाऱ्या 'युवा डान्सिंग क्वीन' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोद्वारे गायत्री तिचे नृत्यावरील प्रेम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.


तसं पाहता गायत्रीने या आधी कधीच नृत्य स्पर्धेत भाग घेतला नाही आहे . मात्र जेव्हा तिला कळले की,  वेस्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवगेळ्या डान्सफॉर्म असणारा 'युवा डान्सिंग क्वीन' हा सेलिब्रेटींचा डान्सिंग रिऍलिटी शो आहे,  तेव्हा मात्र तिने लगेच या स्पर्धेत भाग घेतला. गायत्री या कार्यक्रमात प्रेक्षकांना लोकनृत्य आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म्स आणि अनेक इतर डान्स फॉर्म्सवर थिरकताना दिसेल. एक अत्यंत लाघवी आणि गोड मुलगी आता आपल्याला नृत्याच्या रंगमंचावर तिच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालताना पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात तिच्याबरोबर नावाजलेल्या अनेक सेलेब्रिटी डान्सर पहायला मिळतील आणि त्यांच्यात एक जंगी चुरस सुद्धा रंगेल. सौंदर्य आणि अदाकारीने ठासून भरलेल्या या सौंदर्यवती जेव्हा 'युवा डान्सिंग क्वीन'च्या रंगमंचावर थिरकणार त्यामुळे आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार.


'युवा डान्सिंग क्वीन'बद्दल विचारले असता गायत्रीने सांगितले, "प्रेक्षकांनी मला अगदी साध्या सरळ गोड ईशाच्या भूमिकेत पहिले आहे आणि या भूमिकेवर प्रेमही केले आहे. पण मी आता तुमच्यासमोर अगदी वेगळ्या रूपात येणार आहे. 'युवा डान्सिंग क्वीन' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोद्वारे मी तुम्हाला भेटायला येणार आहे. वेस्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवगेळ्या डान्सफॉर्म सादर करताना तुम्ही मला पाहाल. यासाठी मी खूप मेहनत घेत आहे आणि तुम्हाला माझं नृत्य ही आवडेल याची मला खात्री आहे."  


या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून अप्सरा आली फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षण करणार आहेत.