आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिदा रहमानमुळे या प्रसिद्ध गायिकेचा संसारात आले होते वादळ, गुरुदत्त यांच्या होत्या पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. आपल्या मुलायम आवाजाने हिंदी तसेच, बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण करणारी गायिका म्हणजे गीता दत्त. 23 नोव्हेंबर 1930 रोजी बांगलादेशाच्या बेजनिपुरा गावात जन्मलेल्या गीता दत्त यांची आज 88 वी जयंती आहे. त्यांनी आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची गाणी गायली आणि सर्वच हिट ठरली.

26 मे 1953 रोजी प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत लग्नानंतर गीता रॉय या गीता दत्त झाल्या. 20 जुलै 1973 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मुलायम आवाजाची देणगी लाभलेल्या या गायिका मात्र अल्पायुषी ठरल्या. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. 1946 ते 1966 या 20 वर्षांच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळ्या ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली.

 

जाणून घेऊयात, गीता दत्त यांच्याविषयी बरंच काही आणि सोबतच बघुयात, त्यांचे Rare Photos...
 

बातम्या आणखी आहेत...