आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Geeta Dutt 89th Birthday Special Geeta Dutt And Guru Dutt Controversial Married Life

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वहिदा रहमानमुळे या प्रसिद्ध गायिकेच्या सुखी संसारात उठले होते वादळ, अखेरच्या काळात गेल्या होत्या दारुच्या आहारी 

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः आपल्या मुलायम आवाजाने हिंदी तसेच, बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण करणारी गायिका म्हणजे गीता दत्त. 23 नोव्हेंबर 1930 रोजी बांगलादेशाच्या बेजनिपुरा गावात जन्मलेल्या गीता दत्त यांची आज 89 वी जयंती आहे. त्यांनी आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची गाणी गायली आणि सर्वच हिट ठरली. 26 मे 1953 रोजी प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत लग्नानंतर गीता रॉय या गीता दत्त झाल्या. 20 जुलै 1973 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मुलायम आवाजाची देणगी लाभलेल्या या गायिका मात्र अल्पायुषी ठरल्या. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.  1946 ते 1966 या 20 वर्षांच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळ्या ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली. गुरुदत्त यांनी वहिदा रहमानसाठी गीता दत्त यांच्याकडे पाठ फिरवली होती.  


जाणून घेऊयात, गीता दत्त आणि गुरुदत्त यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी बरंच काही.
.. 

 • सुरमयी करिअरची सुरुवात...

गीता दत्त यांची अनेक अवीट गोडीची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या कानावर रेंगाळत आहेत. त्याकाळातील लोकप्रिय गायिका लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यापेक्षा त्यांचा आवाज अगदी वेगळा होता. गीता यांनी ललिता पवार यांचे पती आणि कंपोजर हनुमान प्रसाद यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले. त्यांनीच या टॅलेंटेड गायिकेला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. वयाच्या 16 व्या वर्षी गीता यांनी सिनेसृष्टीतील त्यांचे पहिले गाणे गायले होते. 1947 साली हनुमान प्रसाद यांच्या 'भक्त प्रहलाद' या पौराणिक चित्रपटातील ‘सुनो-सुनो हरी की लीला सुनाए...’ हे गाणे गायले होते. खरं तर त्यांना फक्त दोनच ओळी गायला मिळाल्या होत्या. पण काहीच ओळीतूनच त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.

 • एस.डी.बर्मन यांच्यासाठी गायली 72 गाणी...

गीता दत्त यांना ‘जोगन’ या चित्रपटातील गाण्यांमुळे प्रसिद्ध मिळाली. त्यांनी गायलेले ‘मैं तो गिरधर के घर जाऊँ...’ हे गाणे आजही रसिकांच्या लक्षात आहे. मेरा सुंदर सपना बित गया (दो भाई), बाबूजी धीरे चलना(आर पार), ना जाओ सैय्या छुडाके बैंय्या (साहब बीबी और गुलाम) या आणि यांसारख्या अनेक अवीट गोडीची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या कानावर रेंगाळत आहेत. एस. डी. बर्मनसुद्धा गीता दत्त यांच्या आवाजामुळे अतिशय प्रभावित झाले होते. त्यांनी एस. डी. बर्मन यांच्यासाठी 72 गाणी गायली, त्यापैकी 43 सोलो गाणी होती. 1947-1949 या काळात त्यांनी आपल्या गोड आवाजाने बॉलिवूडवर राज्य केले होते.   

 • गीता दत्त आणि गुरुदत्त यांची भेट..

'बाजी' या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगदरम्यान गीता आणि गुरु दत्त यांची पहिली भेट झाली होती. गीता यांनी त्यांच्या चित्रपटातील तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले हे गाणे गीता दत्त यांनी गायले होते. त्याकाळात गीता एक स्टार सिंगर होत्या. त्यांनी सुमारे 500 गाणी गायली होती. या भेटीनंतर हळूहळू दोघांमध्ये प्रेम जुळले.  तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यानी 26 मे 1953 रोजी लग्न केले. बंगाली पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. गीता आणि गुरु दत्त यांना तीन मुले झाली. 

 • वहिदा रहमानमुळे उठले संसारात वादळ...

गीता आणि गुरुदत्त यांचा सुखी संसार सुरु होता. पण अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यामुळे त्यांच्या संसारात वादळ आले. केवळ 11 वर्षे गीता आणि गुरुदत्त यांचे लग्न टिकले होते. गीता यांची नणंद ललिता लाजमींनी एका मुलाखतीत सांगितले होते, की दोघांमध्ये इगो होता. कदाचित गीता काही कारणांमुळे गुरुदत्त नाराज होत्या. गीता दत्त आणि गुरु दत्त यांच्यात कायम भांडणे व्हायची. भांडणानंतर गीता मुलांना घेऊन त्यांच्या माहेरी निघून जायच्या.  वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे गुुरुदत्त डिप्रेशनमध्ये गेले होते.  याचकाळात गुरु दत्त आणि वहिदा रहमान यांचे अफेअर खूप गाजले होते. कौटुंबिक समस्या वाढत गेल्यामुळे गीता यांनी हळूहळू गाणे कमी केले होते. याकाळात त्यांच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स निघून गेले होते. 

 • गुरुदत्त यांचे निधन...

गीता यांच्यासाठी गुरुदत्त यांनी गौरी नावाच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले होते. पण दोन दिवसांतच चित्रीकरण थांबवण्यात आले होते. असे म्हटले जाते की, गीता कायम गुरुदत्त यांच्यासोबत भांडण करायच्या. 1964 मध्ये गुरुदत्त भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. असे म्हटले जाते की, त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती. 

 • दारुच्या आहारी गेल्या होता गीता दत्त..

गुरुदत्त यांच्या निधनानंतर गीता दत्त दारुच्या आहारी गेल्या होत्या. याचकाळात गीता दत्त यांना ऑफर झालेली गाणी आशा भोसलेंना मिळू लागली होती. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. चित्रपटांत काम न मिळाल्याने त्या लहान-मोठे स्टेज शो करत होत्या. अखेर 1972 मध्ये लिव्हरच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. गुरुदत्त यांच्या निधनानंतर 9 वर्षांनी गीता दत्त यांनी जगाचा निरोप घेतला होता. 10 ऑक्टोबर 1964 रोजी गुरुदत्त यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नऊ वर्षांनी 20 जुलै 1973 रोजी गीता दत्त यांनीही या जगाचा कायमचा निरोप घेतला.  

 • गुरुदत्त यांच्या चित्रपटांसाठी केले होते पार्श्वगायन...

गीता दत्त यांनी गुरुदत्त यांच्या चित्रपटांसाठी गाणी गायली. ‘बाजी’, ‘आरपार’, ‘सीआईडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘चौदहवीं का चाँद’ या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’, ‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना…हाँ बडे धोखे हैं इस प्यार में’, ‘ये लो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे’ ही गाणी हिट ठरली होती.

 • करिअरमध्ये झाला अन्याय...

गीता दत्त यांच्यासोबत त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच नव्हे तर प्रोफेशनल लोकांकडूनही अन्याय झाला होता. त्यांनी गायलेल्या ‘सुजाता’ यांचा चित्रपटातील गाणे आशा भोसले यांच्या नावाने प्रसिद्ध झाले होते. हा खुलासा गाणे रिलीज झाल्यानंतर 27 वर्षांनी आशा भोसले यांनी एका कार्यक्रमात केला होता. आशा यांनी स्वीकारले होते, की ‘तुम जियो हजारों साल, साल के दिन हों पचास हजार’ हे गाणे त्यांनी नव्हे तर गीता दत्त यांनी गायले होते. संगीतकार देव बर्मन यांनी हे गाणे आशा आणि गीता या दोघींकडून गाऊन घेतले होते. पण ऐनवेळी गीता यांचे गाणे सिलेक्ट झाले पण ग्रामोफोन कंपनीला आशा यांचे नाव गेले. तब्बल 27 वर्षे हे गाणे आशा भोसले यांच्या नावाने चालले.  

 • गीता दत्त यांची सदाबहार गाणी —

-ख्यालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन) -सुनो गजर क्या गाए (बाजी) -न ये चांद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त ) -कैसे कोई जिए, जहर है जिंदगी (बादबान) -जाने कहां मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55 ) -जाता कहां है दीवाने (सीआईडी) -ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है (भाई-भाई ) -आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा ) -मेरा नाम चिन चिन चू (हावडा ब्रिज ) -वक्‍त ने किया क्या हंसी सितम (कागज के फूल )