आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मदेवाच्या विशाल यज्ञाने बनले ब्रह्म सरोवर, येथे साजरा केला जातो गीता जयंती महोत्सव

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

ब्रह्मपुराणानुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचे विशेष महत्त्व आहे. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा दिवस गीता जयंती रूपात साजरा केला जातो. यावेळी गीता जयंती 8 डिसेंबरला रविवारी आहे. हरियाणातील कुरुक्षेत्रविषयी मानले जाते की, या ठिकाणी महाभारताचे युद्ध झाले होते आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश येथेच ज्योतीसर नामक ठिकाणी दिला होता. कुरुक्षेत्रमधील ब्रह्मा सरोवर येथे प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय गीता जयंती मोहोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी गीता जयंती महोत्सव 22 नोव्हेंबरपासून सुरु होत असून 10 डिसेंबरपर्यंत चालेल.

ब्रह्मदेवाने विशाल यज्ञ करून बनवला ब्रह्म सरोवर 
पौराणिक कथा मान्यतेनुसार, कुरुक्षेत्र येथे भगवान ब्रह्मदेवाने विशाल यज्ञ करून ब्रह्म सरोवर निर्माण केले होते. येथे महादेवाचेही एक मंदिर आहे. एक पूल पार करून येथे पोहोचले जाऊ शकते. गीता जयंतीला येथे दीपदानचे आयोजन केले जाते. 

अश्वमेध यज्ञासमान पुण्य प्राप्ती 
मान्यतेनुसार, या कुंडात डुबकी लावल्याने अश्वमेध यज्ञ केल्याएवढे पुण्य प्राप्त होते. हे कुंड 1800 फूट लांब आणि 1400 फूट रुंद आहे. या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी सूर्यग्रहण आणि गीता जयंतीला खूप गर्दी होते. शास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्व देवता कुरुक्षेत्रावर उपस्थित असतात. या दिवशी ब्रह्मा सरोवर आणि सन्निहित सरोवरामध्ये स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते.

भगवान श्रीकृष्णाने याठिकाणी केले होते स्नान
या सरोवर संदर्भात अशीही एक मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाने याठिकाणी स्नान केले होते. प्राचीन काली ब्रह्म सरोवरचे नाव ब्रह्म देवी आणि रामहृद असेही होते. काही काळानंतर राजा कुरूच्या नावावर कुरुक्षेत्र पडले. या ठिकाणी ऋषींनी वेदांची रचना आणि ब्रह्मदेवाने विशाल यज्ञ केला होता. याचठिकाणी महर्षी दधिची यांनी इंद्रदेवाला अस्थीदान केले होते.

बातम्या आणखी आहेत...