आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Election 2014: Congress Candidate Imran Masood Arrested

VIDEO: मोदींच्या खांडोळीची धमकी देणा-या मसूद यांची राहुल गांधींकडून \'कान उघाडणी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सहारनपूर येथील काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांना आज (शनिवार) कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाबाहेर आल्यानंतर मसूद म्हणाले, 'मोदींविरोधात बोलल्यामुळे शिक्षा होत असेल तर, मी शंभरवेळा तुरुंगात जाईल. मात्र मोदींची माफी मागणार नाही. मी निवडणूक लढणार आहे.'
तर, दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची कान उघाडणी केली आहे. विरोधक कितीही शेलक्या शब्दात टीका करीत असले तरी, आपण सौजन्याने आणि प्रेमानेच बोलले पाहिजे, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला आहे. गाझीयाबाद येथील सभेत राहुल गांधी म्हणाले, 'सहारनपूर येथील आमच्या उमेदवाराने सहा महिन्यांपूर्वी एक भाषण केले, त्यात विरोधी पक्षातील नेत्याविरोधात जे शब्द प्रयोग केले ती काँग्रेसची विचारधारा नाही.
काँग्रेस सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे. विरोधक आमच्यावर कितीही घाणेरडे आरोप करीत असले तरी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रेमानेच बोलले पाहिजे.' प्रेमानेच बोलले पाहिजे, यावर राहुल गांधी यांनी विशेष जोर दिला होता. गांधी यांच्या या वक्तव्याने काँग्रेस सहारनपूर येथील उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषम्हणजे, शुक्रवारी मसूद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आजचा सहारनपूर दौरा रद्द केला आहे.
उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेत्या रिटा बहुगुणा यांनी देखील, मसूद यांचे वक्तव्य सहा महिन्यांपूर्वीचे असल्याचे म्हटले आहे.
भाजपने या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मसूद यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले होते मसूद ?
मसूद यांचा वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात ते एका सभेत मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतात. ते म्हणतात, 'मोदींविरुद्ध कोण लढेल? नाटकबाजीसाठी कुणी काहीही करो, पण मोदींना प्रत्युत्तर हा इम्रानच देईल. हे यूपी आहे, गुजरात नाही. गुजरातेत फक्त 4% मुसलमान, तर येथे 42% आहेत. मोदीची खांडोळीच करून टाकेन.'
पुढील स्लाइडमध्ये, मोदींची माफी मागण्यास नकार