Home | Business | Auto | general-motors-to-launch-electric-car

पेट्रोल-डिझेलपासून सुटकारा देणारी मोटार

बिझनेस ब्यूरो | Update - May 20, 2011, 11:16 AM IST

अमेरिकेतील जनरल मोटर्स लवकरच भारतात एक इलेक्ट्रिक मोटार सादर करणार आहे.

  • general-motors-to-launch-electric-car

    अमेरिकेतील जनरल मोटर्स लवकरच भारतात एक इलेक्ट्रिक मोटार सादर करणार आहे. तळेगावमधील कंपनीच्या कारखान्यात ही मोटार बनविण्यात येत आहे.

    जनरल मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिमने म्हणाले, ही छोटी इलेक्ट्रिक मोटार जूनमध्ये सादर करण्यात येणार आहे. या मोटारीला अमेरिकेमध्ये तयार करण्यात आले आहे. जीएम इंडियाच्या बेंगलुरू प्रकल्पात या मोटारीवर संशोधन करण्यात आले होते.

    भारतातील आणि अमेरिकेतील अभियंत्यांनी मिळून या मोटारीची निर्मिती केलीये. ही इलेक्ट्रिक मोटार एकदा चार्ज केली की १०० किलोमीटर चालते. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मोठी बचत होणार आहे. शहरांमध्ये चालविण्यासाठी ही मोटार खूप उपयुक्त ठरू शकते.

Trending