Home | Jeevan Mantra | Dharm | general rules of god worship in marathi

स्नान करताना देवाचे मंत्र किंवा स्तुती म्हणू नये, वाचा पूजेचे सामान्य नियम

रिलिजन डेस्क | Update - Aug 23, 2018, 10:22 AM IST

पूजा-पाठशी संबंधित नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी फार लोकांना माहिती नसतात. यामुळे रोज घरामध्ये केल्या जाणाऱ्या पूजन कर्मा

 • general rules of god worship in marathi

  पूजा-पाठशी संबंधित नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी फार लोकांना माहिती नसतात. यामुळे रोज घरामध्ये केल्या जाणाऱ्या पूजन कर्मात नकळतपणे काही चुका होतात. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. काही चुकांमुळे दोषही लागतात. ग्रंथांमधील या नियमांमध्ये देवी-देवतांना अर्पण करण्यात येणारे फुल, पत्र आणि पूजा करण्याच्या दिशेसहीत इतर महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आणि कामापासून दूर राहावे याविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे.

  काय करावे -
  - एका हाताने नमस्कार करू नये. स्नान करताना देवाचे मंत्र किंवा स्तुती म्हणू नये. जप करताना जीभ किंवा ओठ हलवू नयेत. याला उपांशु जप म्हणतात. याचे फळ शंभर पटीने फलदायक असते. जप करताना उजवा हात कपडा किंवा गौमुखीने झाकून घ्यावा. पूजा झाल्यानंतर आसनाखालील जमिनीला स्पर्श करून डोळ्यांना स्पर्श करावा. देवी पूजेमध्ये लाल आसन आणि विष्णू पूजेमध्ये पिवळे आसन वापरावे. महादेवाच्या पूजेमध्ये कुशचे आसन वापरावे.


  - पूजेमध्ये तुपाचा दिवा आपल्या डाव्या तसेच देवतांच्या उजव्या बाजूला तांदुळावर ठेवावा. सर्व धार्मिक कर्मामध्ये पत्नीने उजव्या पतीच्या उजव्या बाजूला बसून धार्मिक क्रिया पूर्ण कराव्यात. कपाळावर गंध, टिळा लावूनच पूजा करावी. कोणत्याही व्यक्तीला वस्तू किंवा दान उजव्या हाताने द्यावे.


  काय करू नये -
  संक्रांती, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, रविवार आणि सूर्यास्ताच्या वेळी तुळस तोडू नये. यामुळे दोष लागतो. दिव्याने दिवा लावू नये. भोजन प्रसाद ओलांडू नये.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, फुल, पत्र आणि पाण्याशी संबंधित गोष्टी...

 • general rules of god worship in marathi

  महादेवाला बिल्वपत्र, श्रीविष्णुंना तुळस, श्रीगणेशाला दुर्वा, लक्ष्मीला कमळ प्रिय आहे. महादेवाला कुंद, श्रीविष्णुंना धोत्रा, देवीला रुई तसेच मदार आणि सूर्यदेवाला तगरचे फुल अर्पण करू नये. श्रीगणेशाला तुळस, दुर्गा देवी आणि सूर्यदेवाला बेलाचे पान अर्पण करू नये.

 • general rules of god worship in marathi

  - पाच रात्रीपर्यंत कमळाचे फुल शिळे होत नाही.


  - दहा रात्रीपर्यंत तुळशीचे पान  शिळे होत नाही.


  - सोने आणि चांदीच्या भांड्यात ठेवलेले पाणी अशुद्ध होत नाही.

Trending