आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीशांहूनही सर्वसामान्य लोक जास्त दानशूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण इंटरनेटवर वेळ घालवतो. ६० कोटी भारतीय हेच करतात. त्यात एकमेकांप्रती अनेक घृणास्पद आणि वाईट गोष्टी करताना लोक आढळून येतात. कधी कधी आपणही त्याच भावनेतून एखादी प्रतिक्रिया देतो.  मुखवट्यांमागे राहून वाईट बोलताना आपण सुरक्षित अाहोत असे बहुधा वाटत असावे. एक खोटी ओळख वा नाव किंवा खोटे छायाचित्र वापरून शक्तिशाली असण्याचा दंभ आपण अनुभवतो. यात जबाबदारी नसते. मात्र हा केवळ एक क्षण असावा, जो लगेच संपून जाईल. तिरस्कार - विष या फक्त लाटा आहेत, ज्या संस्कृतीच्या समुद्रात स्वार होऊन फक्त खळबळ माजवतात. ही तीच संस्कृती, जिला आपण ‘भारत’ म्हणतो. ५००० वर्षांचा इतिहास. ज्ञान, संयम आणि सहानुभूतीचे मूर्तिमंत रूप. या खळबळीमुळे समन्वयात्मक परंपरा ओळखायला कदाचित अडचणी येतील. या परंपरेतच अनेक संस्कृतींनी आकार घेतला. त्यातूनच तयार झाला मानव. द्वेष आणि तिरस्काराने भरलेल्या निवडणुकीच्या मोसमानंतर आज मैत्री, दया आणि सहृदयतेची चर्चा करूया अनोळखींशी प्रेमाने वागण्याची. नुकतेच बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत राहून मी भारतात दररोज होणाऱ्या दानावर एक शोधप्रबंध तयार केला. आपल्या देशात वर्षभर (२०१७) सर्वसामान्य लोकांनी ३४ हजार कोटी रुपयांचे दान केले. धार्मिक संस्था, समुदाय आणि संकटानंतर हे दान दिले गेले. देशातील सर्व अब्जाधीश आणि सरकारच्या कोणत्याही योजनेपेक्षा हे दान कितीतरी जास्त आहे. अनोळखींच्या या मदतीचा खूप गहिरा अर्थ आहे. हा मानवतेचा असा विचार आहे, जो धर्म आणि जातीहून कितीतरी लांब आणि मोठा आहे.


हा सर्वव्यापी आणि मोक्षाशी संबंधित विचार आहे. सर्वसामान्य लोकांना तो प्रयत्नांची प्रेरणा देतो. आपला पैसा आणि वेळ ओळखींच्या, विश्वासू माणसांना देणे ही तशी नैसर्गिक भावना. मात्र संकटात असलेल्या अनोळखी लोकांनाही मदत करावी ही भावना आपल्या आत कुठेतरी असते. आपण संवेदनशील असतो. त्या संकटग्रस्त अनोळखी व्यक्तीच्या जागी स्वत:ला पाहतो. ज्या सहानुभूतीची अपेक्षा आपल्याला असते त्याच भावनेने आपण त्याच्याशी व्यवहार करतो. लंगर, सेवा जकातसारख्या परंपरा कोट्यवधी लोकांना श्रमदानासाठी प्रेरित करतात. अनेक कुटुंबात घराबाहेर वाटसरूंसाठी पाण्याचे मडके ठेवण्याची परंपरा अव्याहत चालू आहे. आपण सर्वांनी ऑटोचालकाने मौल्यवान सामान परत केल्याच्या बातम्या वाचल्यात. प्रत्येक भारतीयाने कधी ना कधी अनोळखी व्यक्तीचा दयाळूपणा अनुभवला आहे. आपल्या देशात दानपेटीचे अाध्यात्मिक महत्त्व आहे. पूर्ण जगात स्वयंसेवक आणि दान देणाऱ्यांपैकी सर्वाधिक भारतीय असल्याचे आढळून आले आहे. अमेरिका, चीनहूनही जास्त. एका अनोळखीला मदत केल्याचे माझ्या आजही स्मरणात आहे. लिखाणातून कमावलेले काही पैसे दोन मुलींना स्कॉलरशिपच्या रूपात दिले होते. मी त्यांना ओळखत नाही. कधी भेटलेही नाही. मात्र ही अनुभूती दिवाळीतील पणतीसारखी आत तेवत होती. शाळेचे महत्त्व समजावून सांगितल्यामुळे त्या मुली शाळेत जायला लागल्या. श्रीमंत बनण्याआधी जे पैसे आणि वेळ मी दुसऱ्यांसाठी दिला तो आज दिलेल्या दानापेक्षा कितीतरी पट महत्त्वपूर्ण आहे.


प्रत्येक दिवशी छोटी-छोटी मदत करणारे अतिश्रीमंत परोपकारी शक्तिशाली असतात. कारण ते यशस्वी समाज आणि देशाचे मूळ आहे. आपल्याच जगात कैद राहणे, दुसऱ्यांचे आयुष्य आणि अनुभवातून कोसो दूर राहणे सहजशक्य आहे.  तंत्रज्ञान आपल्याला जगभरातील लोकांना बोलण्याची संधी देते. त्यामुळे सहानुभूती, आपल्या समुदायातील विविधतेत वाहून जाणाऱ्या विचारापासून आपण दूर होऊ शकतो. दररोज काहीतरी देण्याची सवय लोकांचा एकेटपणा घालवते. एकमेकांशी जोडण्यासाठी मदत करते. इतरांत सहभागी होण्याची संधी देते. मेंदू वैज्ञानिकांंच्या शोधानुसार आपण 


जेव्हा दान देतो, मग भलेही ते अल्प असो, त्यामुळे आपली नर्व्ह सिस्टिम आनंदाने चमकून उठते. आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. नातेसंबंध दृढ झाल्याची भावना निर्माण होते. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक मायकल नॉर्टन यांनी अमेरिका ते युगांडापर्यंत १३० देशांच्या डेटावर संशोधन केले. त्यातून आढळले की, जे लोक दुसऱ्यांवर खर्च करतात ते स्वत:वर कमाईचा मोठा हिस्सा उधळणाऱ्या लोकांपेक्षा अनेकपटींनी आनंदी असतात. याच कारणामुळे जॉय ऑफ गिव्हिंग पूर्ण जगात एकसारखी अनुभूती आहे. ही अशी खासियत आहे, जी मानवी स्वभावाच्या केंद्रस्थानी आहे. मग तो कोणत्याही संस्कृतीचा भाग असो. नॉर्टन म्हणतात की, आपल्या सर्वात दुसऱ्यांना मदत करण्याचे नेहमीच आकर्षण असते. 


सुदैवाने आमचा शोध अहवाल सांगतो की, या दशकातील युवा दररोज दान देण्यासाठी उत्सुक असतात. छोटे-छोटे दान देण्याची ही पद्धत दरवर्षी २०-३० टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे दररोज दान देण्याच्या प्रवृत्तीला बळ देण्याची योग्य वेळ आली आहे. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भारतातील हवामान सतत बदलत असते. कधी, कोणते नैसर्गिक संकट येईल हे आपल्याला माहीत नाही. 


सोबतच आपल्यात मोठ्या संख्येने युवक आणि अशी लोकसंख्या आहे, जी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नाही. नैसर्गिक संकटातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मदत आणि सहकार्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. अनोळखींची मदत यात महत्त्वाचा मुद्दा. आमचा अहवाल हेच सिद्ध करतो की, आपल्या देशात ही परंपरा रुजत आहे.