आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे उत्कर्षच्या 'जीनियस'ची स्टोरी, 'गदर'मध्ये झळकला होता बालकलाकाराच्या भूमिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गदर' फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आगामी 'जीनियस' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून ते आपल्या मुलाला लाँच करत आहेत. या चित्रपटात भरपूर अॅक्शन दिसेलच, शिवाय यात एक प्रेमकथा दाखवली जाईल. ती आजच्या तरुणांना आकर्षित करेल, असे अनिल यांनी सांगितले. 

 

या चित्रपटाचे चित्रीकरण यूपी आणि उत्तराखंडच्या 14 शहरांत आणि मॉरिशसमध्ये झाले आहे. यात कृष्णाच्या रासलीलांना मॉर्डन टच देण्यात आला आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा स्वत: मथुरा आणि वृंदावन येथील आहेत. त्यामुळे त्यांनी कृ़ष्णाची पार्श्वभूमी यात दाखवली आहे. याचे अॅक्शन दृश्य मुंबईत आणि मॉरिशसमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. याविषयी अनिल यांनी सांगितले, या चित्रपटात उत्कर्षच्या रोमान्स आणि अॅक्शन दृश्याबरोबरच काही संस्कृतमधील मंत्रोच्चारदेखील दिसेल. त्यामुळे उत्कर्षने चित्रीकरणाआधी काही आठवडे संस्कृत भाषादेखील शिकली. तो परदेशात शिकला आहे. मात्र हिंदी आणि संस्कृतवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये बोलण्यात त्याला अडचण आली नाही.

 

या चित्रपटात किशोरवयीन मुलांची प्रेमकथादेखील दाखवण्यात येईल. यात उत्कर्षने 17 वर्षांच्या मुलाची भूमिका केली आहे. त्याला नंदिनी चौहान या मुलीशी प्रेम होते. नंतर 22 व्या वर्षी त्यांची भेट होते. 


आता चित्रपटातून गायब झाले पहिल्या नजरेतील प्रेम... 
अनिल यांनी पुढे सांगितले, आताच्या चित्रपटात पहिल्या नजरेत होणारे प्रेम दिसत नाही. त्यामुळे यात चित्रपट इनोसेंट लव्ह दाखवले जाईल आणि पहिल्या नजरेतील प्रेम दाखवले जाईल. आम्ही बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाविषयी चर्चा करत होतो. जसा विचार केला तसाच याला बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव आणि नंदिनीच्या माध्यमातून आम्ही निष्पाप प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

ही आहे फिल्मची स्टोरी...

वासुदेव 17 वर्षांचा मथुरेचा मुलगा आहे. तेथून तो निघून आयआयटी रुडकीला जातो, पुढे रॉ एजेंट होतो. तेव्हा तो 25 वर्षांचा होतो. तोपर्यंत त्याला दुनियादारीची चांगली ओळख झालेली असते. वय झाल्यानंतर आणि जीवनात खूप अडचणी पाहिल्यानंतर त्याचा निरागसपणा कायम राहतो का? प्रेमाविषयी त्याच्यात काही बदल होतो का? हे सर्व चित्रपटात पाहायला मिळेल. यशस्वी हिरोप्रमाणे आम्हाला वासुदेवला सादर करायचे होते. तो स्वत:च्या अनुभवातून वर आलेला असतो. होळीच्या गाण्यात आम्ही त्याला 17 वर्षांचा दाखवले आहे. नंदिनीसाठी आम्हाला 18 ते 19 वर्षांची मुलगी हवी होती. त्यामुळे आमचे हीरो-हिरोइन 12वी पास मुले आहेत. त्यांच्यात प्रेम जडते. 

बातम्या आणखी आहेत...