आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुकेश कौशिक
नवी दिल्ली - कोठे किती कर्करोगाचे रुग्ण आहेत हे कळण्यासाठी देशात प्रथमच रुग्णांचे जिओ टॅगिंग होत आहे. याच आधारावर एक नकाशा तयार करण्यात येत आहे, त्याद्वारे कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण देशातील कोणत्या भागातून उपचारासाठी केंद्रावर येत आहेत हे कळेल. जेथे जास्त रुग्ण असतील तेथे नकाशावर लाल रंगाचा ठिपका दिला जाईल.
जिओ टॅगिंगमध्ये रुग्ण आणि त्याच्या आजाराची पूर्ण माहिती संग्रहित राहील. महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व आणि ईशान्य भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे प्रारंभीच्या टॅगिंगद्वारे समोर आले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. अणुऊर्जा मंत्रालयाअंतर्गत टाटा मेमोरिअल सेंटर हे रुग्णांच्या टॅगिंगचे काम करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दरवर्षी कर्करोगाची १६ लाख प्रकरणे समोर येत आहेत. यात सर्वाधिक दोन लाख आतड्याच्या कॅन्सरची आहेत, तर स्तनाच्या कॅन्सरची एक लाख ४० हजार प्रकरणे आहेत. एक लाख मुख कर्करोगाची, ४५ हजार पुरुषांच्या अन्ननलिका कॅन्सरची आणि ९० हजार प्रकरणे गळ्याच्या कर्करोगाची आहेत. टाटा मेमोरिअल सेंटरनुसार, कॅन्सरच्या दोन तृतीयांश रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराचा मुकाबला करणारी सरकारी व्यवस्था तोकडी आहे. मागील सहा महिन्यांत ७५ हजार रुग्ण टाटा मोमोरियल सेंटरमध्ये आल्याचे जिओ टॅगिंगमुळे समोर आले आहे. पुढील वर्षी ही संख्या ८० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या ग्लोबोकॅन या संस्थेच्या मते, पुढील १५ वर्षांत ही संख्या वर्षाला १३ लाखांवरून वाढून २०३५ मध्ये १७ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
उपचारासाठी ‘स्पोक अँड हब’ मॉडेल वापरण्याचा विचार सुरू
कर्करोगाचा सामना करण्यासाठी स्थापित संसदीय समिती ‘स्पोक अँड हब’ या मॉडेलचा अंगीकार करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार, राज्यस्तरावर कर्करोगाशी लढा देण्यासाठी स्पोकप्रमाणे स्थानिक रुग्णालयात तयार केली जाईल आणि गुंतागुंतीच्या कर्करोगाशी लढण्यासाठी या रुग्णालयात वेगळे हब असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.