• Home
  • Gossip
  • Georgia Andriani says 'Arbaaz is a good friend of mine, whenever the right time comes, i will get marry'

Bollywood / जॉर्जिया अँड्रियानी म्हणाली - 'अरबाज माझा चांगला मित्र आहे, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा लग्न करेन'

हिंदी भाषा शिकण्याबरोबरच जॉर्जिया कथ्थक नृत्यदेखील शिकत आहे

दिव्य मराठी वेब

Aug 11,2019 05:42:51 PM IST

बॉलिवूड डेस्क : इटलीहून दोन वर्षांपूर्वी मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईला आलेली जॉर्जिया अँड्रियानी अनेक दिवसांपासून सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सध्या हिंदी भाषा शिकण्याबरोबरच जॉर्जिया कथ्थक नृत्यदेखील शिकत आहे. तिच्या केलेल्या बातचीतीतील काही भाग...

अरबाजसोबतच्या नात्याबद्दल किती सीरियस आहेस ?
'अरबाज माझा चांगला मित्र आहे आणि मलाही विवाहबंधनात बाधा व्हायचेच आहे. पण अजून मी याबद्दल विचार करत आहे. जेव्हा मला वाटेल की, योग्य वेळ आली आहे, तेव्हा मी लग्न करेन. मग मी मागचा विचार करणार नाही. आम्ही दोघे एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतो, त्यामुळे आमची खूप चांगली मैत्री आहे.'

सलमान खानचा चित्रपट 'दबंग-3' मध्ये तुझ्या एंट्रीविषयी ऐकले होते, सत्य काय आहे ?

'याबद्दल मला जास्त माहिती नाही, जर असे झाले तर त्या ब्रॅण्डसोबत जोडले जाणे माझ्यासाठी एक उत्तम संधी असेल.'

सध्या तू हिंदी शिकण्याबरोबरच भरतनाट्यम देखील शिकत आहेस ?
हो, हिंदी शिकत आहे. आधी ऐकून शिकायचे, पण आता शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचणे, बोलणे आणि लिहिणे... सर्वकाही शिकत आहे. मागचे दोन वर्ष या देशात आहे त्यामुळे हे गरजेचेही आहे. डान्स बद्दल बोलायचे तर ते मला पर्सनली खूप आवडते. भविष्यात जर असा एखादा रोल ऑफर झाला, ज्यामध्ये कथ्थक डान्स करण्याची गरज असेल, तर तेव्हा हे माझ्या कामी येईल. याव्यतिरिक्त बेली डान्स आणि बॉलिवूड फ्री स्टाइलदेखील शिकत आहे.

अद्याप एखादे प्रोजेक्ट का नाही केले ?
मी मॉडेलिंगमध्ये व्यस्त आहे. मला अनेकदा ऑफर्स आल्या आहेत, पण योग्य वेळेची आणि योग्य प्रोजेक्टची मी वाट पाहात आहे. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये चांगला डेब्यू करू शकेन. सध्या वेब सीरीज आणि फीचर फिल्म दोन्हीच्या चांगल्या स्क्रिप्ट्स माझ्याकडे आल्या आहेत.

आपल्या फॅमिली बॅकग्राउंड विषयी थोडे सांगशील ?
आई वडील आणि आम्ही तीन बहिणी आहोत. मी दुसऱ्या नंबरची आहे. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे, तर आई गृहिणी आहे. मोठी बहीण जर्मनीमध्ये राहाते. सर्वात लहान बहीण 15 वर्षांची आहे, ती अजून शिकत आहे.

X
COMMENT