Germany / जर्मनच्या राष्ट्रपतींनी हिटलरच्या अत्याचाराबद्दल पोलंडची मागितली माफी, हा मानवताविरोधी गुन्हा

पोलंडमधील ६० लाख लाेक झाले होते ठार, यात यहुदी लोकांचा होता समावेश

Sep 03,2019 09:19:00 AM IST

विलुन - दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पहिल्या हल्ल्यास रविवारी ८० वर्षे पूर्ण झाली. हा हल्ला जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याने पोलंडच्या विलुन येथे केला होता. यानिमित्ताने विलुनमध्ये नुकतेच शहीद स्मारकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जर्मन चान्सलर अंगेला मर्केल, राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टीनमियर, अमेरिकी उपराष्ट्रपती माइक पेन्स, ब्रिटनचे महापौर सादिक खान यांच्यासह ४० जणांची उपस्थिती होती. जर्मन राष्ट्रपती वॉल्टर म्हणाले, अत्याचाराच्या घटनेबद्दल मी माफी मागतो. पोलंडवरील नाझी सैन्याचा हल्ला हा मानवतेविरोधात मोठा गुन्हा होता. या हल्ल्यात ६० लाख लोक ठार झाले होते. मृतांत मोठ्या संख्येने यहुदींचा समावेश होता. या युद्धात झालेल्या विध्वंसाबद्दल पोलंड जर्मनीकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे.

पुतीन यांना निमंत्रण नव्हते, ट्रम्प व जॉन्सन यांचा दौरा रद्द

कार्यक्रमात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हजर नव्हते. तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना निमंत्रण पाठवण्यात आले नव्हते.

लोकांत दहशत बसावी म्हणून पहिला हल्ला विलुनवर
१ सप्टेंबर १९३९ च्या सकाळी जर्मन वायुसेना लुफ्वाफेने लोकांमध्ये दहशत बसावी म्हणून विलुन शहरावर बॉम्ब टाकले. हे युद्ध ६ वर्षे चालले.

X