उत्तर जर्मनीत विषाणूचा हैदोस; खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याचा सल्ला

agencies | Update - May 27, 2011, 12:18 PM IST

उत्तर जर्मनीत ई-कॉलाई (इएचईसी) या नव्या विषाणूने हैदोस घातला असून, या विषाणूमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

  • germany-virus

    उत्तर जर्मनीत ई-कॉलाई (इएचईसी) या नव्या विषाणूने हैदोस घातला असून, या विषाणूमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २१५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने जनतेला खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याचा इशारा दिला आहे.
    या आजारात व्यक्तीला पोटात सहन होण्यापलीकडील वेदना होऊ लागतात. लाल रक्तपेशीतील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. वेळेवर उपचार झाला नाही तर पोट फुगून व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वरील लक्षणे दिसून येताच तत्काळ उपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दुसरीकडे पीडित रुग्णांमध्ये महिलांचाच अधिक समावेश आहे. यासाठी नागरिकांनी भाजीपाल्याचा वापर करताना स्वच्छता पाळावी, असेही सांगण्यात आले आहे. हा विषाणू कोणत्याही औषधाला जुमानत नसल्याचे म्युएन्स्टरच्या संशोधन प्रयोगशाळेने काढलेल्या निष्कर्षात स्पष्ट झाले आहे.Trending