आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Germany's Telecommunications Company Will Have To Pay 75 Cents For Disclosure Of Important Data By Asking For Name And Date Of Birth.

नाव आणि जन्म तारीख विचारून ग्राहकांचा महत्त्वाचा डेटा जाहीर करायची जर्मनीची दूरसंचार कंपनी, द्यावा लागेल 75 काेटींचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युराेप राष्ट्रसंघाच्या डेटा सुरक्षा कायद्यांतर्गत कंपनीवर करण्यात आली माेठी कारवाई
  • गेल्या वर्षी अस्तित्वात आलेल्या कायद्याच्या मदतीने नियामकांनी कंपनीवर केली दंडात्मक कारवाई

​​​​​​बर्लिन : कॉल सेंटरवर बेपर्वाईने काम केल्यामुळे जर्मनीतील १ अँड १ ही इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनी अडचणीत सापडली आहे. युराेप राष्ट्रसंघाच्या डेटा सुरक्षेवर देखरेख करणाऱ्या जीडीपीआरने आराेप केला आहे की, कंपनीच्या काॅल सेंटरवर काेणत्याही ग्राहकाचे नाव व जन्मतारीख विचारून त्यांच्याशी निगडित महत्त्वाचा डेटा प्राप्त करून घेऊ शकते, असा आराेप केला आहे.

कंपनीवर १.०६ काेटी डाॅलरचा (जवळपास ७५ काेटी रुपये) दंड आकारण्यात आला आहे. तज्ञांच्या मते फसवणूक करणारी काेणतीही व्यक्ती सहज एखाद्या व्यक्तीच्या साेशल मीडिया प्राेफाइलवर जाऊन त्याच्याशी निगडित माहिती प्राप्त करू शकते व नंतर इंटरनेट सेवा पुरवठादाराच्या काॅल सेंटरला फाेन करून त्याच्याशी निगडित माहितीही मिळवू शकते.

युराेप राष्ट्र संघाच्या देखरेख संस्थेने एखाद्या कंपनीवर आकारलेल्या सर्वात जास्त दंडांपैकी हा एक आहे. १ अँड १ ने हा निर्णय स्वीकारणार नसल्याचे म्हटले असून दंडाच्या विराेधात अपील करणार आहे. वन अँड वनने म्हटले आहे की, दंड पूर्णत: अनुचित नाही. नियामकांनी दंडाची रक्कम कंपनीच्या ढाेबळ विक्रीवर आधारित निश्चित केली आहे. अशा स्थितीत किरकाेळ चुकीसाठीदेखील माेठा दंड आकारला जाताे. नवीन सिक्युरिटी प्राेटाेकाॅल लाँच करण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा प्राेटाेकाॅल लाँच झाल्यानंतर काॅल करणाऱ्याला सिक्युरिटी पिन सांगावा लागेल. युराेपियन राष्ट्र संघाने मे २०१८ पासून नवीन डेटा प्राेटेक्शन कायदा लागू केला आहे. त्यामुळे डेटा प्राेटेक्शन अथाॅरिटीला कंपन्यांच्या चुकीसाठी माेठा दंड आकारण्याचा अधिकार मिळाला आहे. अतिगंभीर प्रकरणात अथाॅरिटी कंपन्यांवर त्यांनी जागतिक पातळीवर मिळवलेल्या वार्षिक महसूल रकमेच्या ४ टक्के दंड आकारू शकते. नियामकांना दंडाची रक्कम निश्चित करण्याच्या आधी कंपनीने चाैकशीत किती सहकार्य केले. याआधी काेणत्या नियमांचे उल्लंघन केले, कंपनीने मुद्दामहून चूक केली की अजाणतेपणाने केली हे लक्षात घ्यावे लागते. चूक जाणूनबुजून असेल तर त्याने सायबर सुरक्षेला धाेका असेल तर जास्त दंड आकारला जाताे.

प्रॉपर्टी कंपनीवर लावलेला ११४ काेटी रुपयांचा दंड

१ अँड १ च्या प्रकरणात नियामकांच्या मते कंपनीने चाैकशीमध्ये सहकार्य केले. पण दंडाची रक्कम अशासाठी याेग्य आहे की कंपनीच्या चुकीमुळे लाखाे लाेकांचा डेटा धाेक्यात आला आहे. ऑक्टाेबरमध्ये याच नियामकांनी जर्मनीच्या प्राॅपर्टी कंपनीवर ११४ काेटी रुपयांचा दंड आकारला हाेता. कंपनीवर गरजेपेक्षा जास्त वेळ लाेकांचा पर्सनल डेटा जवळ ठेवल्याचा आराेप हाेता.
 

बातम्या आणखी आहेत...