आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 10 वर्षे करा गुंतवणूक; दरवर्षी खात्यात जमा होतील लाखो रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुमचे वय 25 ते 30 च्या दरम्यान असेल तर तुमच्याकडे गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. तुम्ही फक्त 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास स्वत:साठी मोठा फंड जमा करु शकता. त्याशिवाय जितक्या जास्त कालावधीपर्यंत तुम्ही खात्यात पैसे ठेवाल तेवढ्याच प्रमाणात तुमची रक्कम वाढत राहील. सिस्टिमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन (SIP)या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास 10 वर्षानंतर तुम्ही लोखोवधीं संपत्तीचे मालक व्हाल.  

 

10 वर्षांत जमा करा 34 लाखांचा फंड
जर तुम्ही 'SIP'मध्ये 10 वर्षांपर्यंत 15,000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या पैशांवर 12 टक्के व्याजदराने वाढीव रक्कम मिळेल. म्हणजेच 10 वर्षानंतर तुम्हाला 34 लाख मिळतील.

 

गुंतवणूक करण्याचा कालावधी 10 वर्षे 
मासिक गुंतवणूक 15,000 रुपये 
व्याजदर  12 टक्के
एकुण जमा रक्कम 33.60 लाख 

 

गुंतवणूक करणे बंद केले तरी दरवर्षी खात्यात जमा होतील लाखो रुपये

तुम्ही 10 वर्षे गुंतवणूक केल्यास तुमच्या 'SIP' खात्यात 34 लाख रुपये जमा होतील. त्यानंतर तुम्ही खात्यात पैसे तसेच ठेवल्यास तुमच्या खात्यातील रकमेवर 10 टक्के व्याजदराने पैसे जमा होतील. त्यामुळे 10 वर्षानंतर गुंतवणूक न करता दरवर्षी तुमच्या खात्यात 3 लाख रुपये जमा होत राहतील.

 

बातम्या आणखी आहेत...