आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या छतावर मोफत बसवा सोलार पॅनल, 1 रुपया/यूनिट दराने मिळेल वीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वाढते विजदर सध्या डोखेदुखीचे कारण बनले आहे. अशात लोक छतावर सोलार प्लांट लावण्याचा विचार करत आहेत. परंतु, सोलार पॅनल अतिशय महागडे आहेत. पण तुम्हाला जर छतावर फ्रीमध्ये सोलार प्लांट बसवायची ऑफर मिळाली आणि त्यासोबत 1 रुपया दरात वीज मिळाली, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण दिल्लीमध्ये हे सत्यात उतरत आहे. दिल्लीतील हा प्रोजेक्ट यशस्वी झाला, तर इतर राज्यात देखील त्याचे अनुकरण करण्यात येऊ शकते.


कुठे लागू असेल योजना...
दिल्ली सरकारची ही योजना कोऑपरेटिव्ह ग्रुप हाउसिंग सोसायटीमध्ये आणि इंडिव्हिजुअल घरांवर लागू करण्यात येईल. या योजनेला मुख्यमंत्री सौर उर्जा योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेला दिल्लीच्या कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.


काय आहे योजना....
या योजनेअंतर्गत रिन्यूएबल एनर्जी सर्विस कंपनी (RESCO) मॉडलवर सोलार प्लांट लावण्यात येईल. म्हणजे एक कंपनी कोणत्याही घराच्या छतावर रुफटॉप सोलार पॅनल आपल्या खर्चावर लावेल आणि नंतर घराला सब्सिडाइज्ड दरावर वीज सप्लाय देईल. कंपनी बाकीची वीज ग्रिडच्या माध्यामातून कमर्शिअली विकू देखील शकते.

 

किती खर्च येणार...
दिल्ली सरकारचे उर्जा मंत्री सतेंद्र जैन यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, कंपनीला 55 हजार रुपयांपासून ते 60 हजार रुपये प्ति किलोव्हॅटचा खर्च सहन करावा लागेल. सरासरी एका घराच्या छतावर 5 किलोव्हॅटच्या प्लांट लागला, तर कंपनीला 2.5 लाखांपासून ते 3 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

 

कितीमध्ये मिळेल वीज...
जैन यांचानुसार, ज्या घरांच्या छतावर प्लांट लावण्यात येईल. त्यांना केवळ एक रुपया/यूनिटच्या दराने वीजबील भरावे लागले. तर, दोन रुपये प्रति यूनिट दराने दिल्ली सरकार सबसीडी प्रामाणे बील भरणार आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, तुम्ही छताचा देखील वापर करू शकता....

 

बातम्या आणखी आहेत...