गुंतवणूक / बजाज फायनांसच्या NRI FD वर मिळवा मल्टी-डिपॉझिट सुविधा

एनआरआय आपल्या ठेवी वाढवण्यासाठी एफडी सारख्या सुरक्षित पर्यायांची निवड करू शकतात

दिव्य मराठी

Sep 23,2019 10:47:41 AM IST
एनआरआय आपल्या ठेवी वाढवण्यासाठी एफडी सारख्या सुरक्षित पर्यायांची निवड करू शकतात, ज्यामध्ये गॅरंटीड रिटर्न दिले जातात. तरीही FD मध्ये गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणुकीतून जास्तीत-जास्त रिटर्न मिळतील याची काळजी घ्यावी. NRI FD मध्ये गंतवणूक करताना तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी आपले पैसे जमा करू शकता आणि गुंतवणुकीच्या स्थैर्यातून त्याचा लाभ घेऊ शकता.

यात सर्वात चांगल्या कंपन्यांपैकी एक बजाज फायनांस असे पर्याय उपलब्ध करून देते, ज्यातून तुमच्या लिक्विडिटीच्या गरजा देखील पूर्ण केल्या जातात. मल्टी-डिपॉझिट सुविधेसह तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही एकाच चेकने अनेक डिपॉझिट करून आपल्या वेग-वेगळ्या गरजा पूर्ण करू शकता. बजाज फायनांसच्या NRI FD सोबत उपलब्ध असलेल्या मल्टी डिपॉझिट सुविधेचा लाभ कसा घेऊ शकता याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.


एकदाच करा अनेक एफडींमध्ये गुंतवणूक
बजाज फायनांसच्या मल्टी डिपॉझिट सुविधेच्या माध्यमातून तुम्ही एकाच चेकने 3, 4 किंवा 5 वेग-वेगळ्या NRI FD उघडू शकता. यामुळे तुमच्यासाठी गुंतवणूक सुविधाजनक राहते. गुंतवणुकीच्या सोप्या मल्टी डिपॉझिटसह लिक्विडिटी सुद्धा मिळते.


मिळवा नियमित लिक्विडिटी
एकाच चेकने गुंतवणूक करतानाही बजाज तुम्हाला वेग-वेगळ्या कालावधीव आणि वेग-वेगळ्या रकमेची एनआरआय एफडी काढण्याची संधी देते. अर्थात तुम्ही गरजेनुसार 12 से 36 महिन्यांच्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीचे चांगले व्यवस्थापन करणे आणि रिटर्नचा अंदाज लावण्यासाठी तुम्ही NRI FD कॅलकुलेटरचा वापर करू शकता.


गरजेनुसार काढता येणार रक्कम
मल्टी डिपॉझिट सुविधा आपातकालीन परिस्थितीत तुमच्यासाठी मदतीची ठरते. कारण, तुम्हाला गरज पडल्यास कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच एक किंवा दोन एफडींची रक्कम काढू शकता. उर्वरीत जमा असलेली रक्कम तशीच राहील. अर्थातच अगदी सहज तुम्हाला ही रक्कम काढता येणार आहे. एकच एफडी असल्यास तुम्हाला गरज पडल्यावर कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पूर्ण रक्कम काढावी लागते.


तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात कशी मदतीची ठरते मल्टी डिपॉझिट सुविधा
बजाज फायनांसच्या गुंतवणूकदार प्रोफाइल आणि कालावधीच्या आधारे वेग-वेगळे व्याज दर दिले जातात. जसे की नवीन ग्राहकांना 8.35 टक्के, विद्यमान ग्राहकांना 8.45 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.70 टक्के. हे दर परिपक्वतेवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेसह किमान 36 महिन्यांच्या कालावधीसाठी आहे.


मल्टी डिपॉझिट फीचर कसे आपले लक्ष्य मिळवण्यात मदत करू शकते हे समजून घेण्यासाठी गृहित धरा की तुम्ही नवीन ग्राहक आहात. कार खरेदी करण्याचा किंवा रिटायरमेंट प्लॅन किंवा युरोपात सुट्टी प्लॅन करू इच्छित आहात आणि यासाठी तुम्हाला 32 लाख रुपयांची गरज आहे. मल्टी डिपॉझिट सुविधेमध्ये गुंतवणूक करताना खालीलप्रमाणे तुमचे लक्ष्य साध्य करता येईल.


गुंतवणुकीचे लक्ष्य

लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक रक्कम रुपयांत

लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक कालावधी वर्षांमध्ये

व्याज

आवश्यक रकमेसाठी गुंतवलेली रक्कम

परिपक्वतेनंतरची रक्कम रुपयांमध्ये

कारची खरेदी

15,00,000

3

8.35%

11,80,000

15,00,959

रिटायरमेंटची प्लॅनिंग

10,00,000

2

8.05%

8,57,000

10,00,531

युरोपात सोलो ट्रिप

7,00,000

1

8.0%

6,48,500

7,00,380

या उत्कृष्ट सुविधेसह बजाज फायनांसच्या NRI एफडीवर व्हॅल्यू अॅडेड फीचर्स सुद्धा देत आहे. ते खालीलप्रमाणे...

- बजाज फायनांसच्या FD ला CRISIL तर्फे FAAA आणि ICRA तर्फे MAAA रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात आपली गुंतवणूक सुरक्षित आहे. या व्यतिरिक्त बजाज फायनांस भारताची एकमेव एनबीएफसी आहे, जी एस अॅण्ड पी ग्लोबलकडून बीबीबी रेटिंगसह आंतरराष्ट्रीय स्थायित्व देते. बाजारात चढ उतार असले तरी तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.
- तुम्ही परदेशात राहत असताना एफडीचे स्वतः नुतनीकरण करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यातून तुम्हाला एफडी परिपक्व झाल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज राहणार नाही. नुतनीकरणावर तुम्ही 0.10 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ देखील घेऊ शकाल.
- बजाज फायनांसची प्रक्रिया सोपी आणि सुकर आहे. NRI FD करण्याचा निर्णय घेतल्यास तुम्हाला आनलाईन फॉर्मवर रिक्वेस्ट करावी लागेल. अर्थात तुम्ही एक्सपीरियाच्या माध्यमातूनही आनलाईन NRI एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता, जे सुरक्षित कस्टमर पोर्टल आहे.

नुकतेच रेपो दरांमध्ये कपात करण्यात आल्यानंतर तुम्हाला जास्त व्याजदर मिळवण्यासाठी लवकरात-लवकर गुंतवणूक करणे आवश्यक बनले. गुंतवणूक करताना मल्टी डिपॉझिटचा लाभ घेण्यास विसरू नका, जेणेकरून तुम्ही तुमच्या लिक्विडीटीच्या गरजा देखील पूर्ण करू शकाल.

X
COMMENT