आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या 59 मिनिटांमध्ये मिळेल 1 कोटींचे लोन, सुरू झाले डिजीटल लॅंडिंग प्लॅटफॉर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. देशातील छोट्या आणि मध्यमवर्गीय व्यावसायिकांसाठी बँकांनीही एक 'डिजिटल लँडिंग ब्लॅफॉर्म' सुरु केला आहे. येथून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही गॅलंटीविना घेतले जाऊ शकते. यासोबतच कर्ज घेण्यासाठी बँकेला फे-या माराव्या लागणार नाहीत. घरबसल्या 59 मिनिटांत लोन मंजूर होईल. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी हे डिजिटल प्लॅटफॉर्म psbloansin59minutes.com लाँच केले आहे. 


कोणते कागदपत्र द्यावे लागतील 
psbloansin59minutes.com वर अर्ज करावा लागेल. यानंतर व्यावसायिक कर्जासाठी तीन प्रकारचे डॉक्यूमेंट मागितले जातील. सर्वात पहिले व्यावसायिकाला आपले GSTIN आणि  GST यूजरआयडी व पासवर्ड द्यावा लागेल. नंतर आयकर रिटर्न ई-फाइलिंगविषयी माहिती द्यावी लागेल. तीसरे आणि शेवटचे म्हणजे बँक खात्याचे स्टेटमेंट अपलोड करावे लागेल किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागेल. 

 

किती लोकांना मिळणार कर्ज 
कागदपत्र अपलोड झाल्यानंतर बँक, मंत्रालय, आयकर विभाग याची तपासणी करतील. जर हे कागदपत्र खरे असल्याचे सिध्द झाले, तर पुढच्या आठवड्यात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. यामध्ये फक्त वर्किंग डेजचा समावेश करण्यात येईल. पहिल्यांदाच सरकारी बँक एमएसएमई सेक्टरला कर्ज देण्यासाठी सोबत आल्या आहेत. यामध्ये SIDBI आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडौदा, पंजाब नॅशनल बँक, भारतीय बँक आणि विजया बँकचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...