आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी मुळांपर्यंत जा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुपोषण ही काही आता लपवण्यासारखी गोष्ट राहिली नाही. हे लपवण्यात काही अर्थ नाही की, देशाच्या काही भागात कमी वजन आणि गरजेपेक्षा कमी वजन असलेली हजारो बालके आहेत. फॉलिक अॅसिडसारखी पूरक औषधे देऊनही कमीत कमी गुजरातेत तरी अॅनिमियाचे बरेच रुग्ण आहेत. कुपोषणाच्या मुद्द्यामुळे या राज्याच्या प्रतिमेचे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे.  आरोग्य आणि कुटुंबकल्याणच्या मुख्य सचिव पदावर बसणाऱ्या लोकांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी या समस्येवर लक्ष द्यावे. त्यांच्यापैकी एक असलेल्या गुजरातच्या जयंती रवी यांना याची जाणीव झाली की, आरोग्यात सुधारणेसाठी ग्रामीण भागातील लोकांना गोळ्या घेण्याची जबरदस्ती करून उपयोगाचे नाही. गरज याची आहे की, या गोष्टी त्यांच्या कलाने घेतल्या गेल्या पाहिजेत. जीवनसत्त्वयुक्त भाज्या उगवून कशा प्रकारे खाव्यात याचे त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे त्यांच्यातील रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते. पण अधिकारी लोक हे आरोग्य केंद्रात पदावर असतात, ते मैदानात उतरू शकत नाहीत. यासाठी त्यांनी याकडे युनिसेफसारख्या जागतिक संघटनांचे लक्ष वेधून घेतले, जेणेकरून त्यांनी हा प्रकल्प हाती घ्यावा. त्यांनी राज्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये पाठीमागच्या अंगणात किंवा टेरेसवर भाज्या उगवण्यास सुरुवात केली. या भाज्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला आणि कुपोषणग्रस्त लोकांना मोफत वाटण्यास सुरुवात केली. जयंती यांच्या डोक्यातून निघालेल्या कल्पनेनुसार या वर्षात फेब्रुवारी महिन्यात गांधीनगरच्या उनावा स्वास्थ्य केंद्रात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, राज्याच्या काही भागातील महिला औषधे घेण्यास नको म्हणतात. यासाठी त्यांनी यावर भाज्यांचा नैसर्गिक तोडगा काढला. यात फक्त भाज्या केवळ दिल्याच जात नाहीत तर भाज्या उगवायच्या कशा हेही शिकवले जाते. उनावामध्ये सरकारने हर्बल गार्डन सुरू केले असून यासाठी सेंद्रिय तज्ञांची मदत घेतली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर येथील विशेष केंद्राचीही मदत घेतली गेली. मातीची भांडी, बांबू, कोको पीट जातीचे गवत आणि ज्यूटची दोरी यांचा उपयोग केला गेला. अशा प्रकारे उनावा आरोग्य केंद्राच्या परसबागेत आणि टेरेसवर १२० प्रकारच्या भाज्या लावल्या गेल्या आहेत. यात पत्ता कोबी, पालक, कोथिंबीर, बीट, फुलकोबी, मेथी यासह अन्य पौष्टिक भाज्यांचा समावेश आहे. हे लावण्याच्या पद्धतीही अगदी साध्या आहेत. उनावामध्ये यश मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने हा प्रकल्प राजकोटच्या बिरसारा आणि नाडियाडच्या थामलामध्ये सुरू केला. अन्य सहा केंद्रांमध्येही हे काम सुरू आहे. केवळ गुजरातेतच १४३३ आरोग्य केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी तसेच सरकारी कॉलेजात हा प्रकल्प राबवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. या प्रकल्पाला मदत देण्याचा युनिसेफचा विचार आहे. याद्वारे सांस्कृतिक आणि पारंपरिक संकटे दूर होतील, जी महिलांना औषधे घेण्यास परावृत्त करतात.

फंडा असा : ज्या मोठ्या समस्या समाजाला व्यापक स्तरावर त्रासदायक ठरतात, त्या समस्या त्यांच्या ‘मुळापर्यंत’ जाऊन सोडवल्या जाऊ शकतात. पूर्वजांचा यावर विश्वास होता आणि त्यांनी हेच केले. ही कडवट गोळी घेणेही सोपे असते.
 

बातम्या आणखी आहेत...