Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | get together of Shrirampur Education Society in nagar

...तब्बल 22 वर्षांनंतर रंगली 'दिल दोस्ती दुनियादारी'

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 05:01 AM IST

व्हॉट्स ॲप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे मानली तर टाईमपास आणि चांगला उपयोग केला तर लाखमोलाची.

 • get together of Shrirampur Education Society in nagar

  श्रीरामपूर - व्हॉट्स ॲप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे मानली तर टाईमपास आणि चांगला उपयोग केला तर लाखमोलाची. याचीच प्रचिती श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थी व शिक्षकांना आली. १९९६ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहमेळावा ठरवला. सोशल मीडियाचा वापर करून सवंगड्यांना सांगावा पाठवला. त्यास प्रतिसाद देत सर्वांनी शाळेत धाव घेतली अन् तब्बल २२ वर्षांनंतर रंगली बालपणाच्या भावविश्वातील 'दिल दोस्ती दुनियादारी'...

  श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या विद्यालयातून १९९६ मध्ये दहावी सुटलेले विद्यार्थी आता पुणे, मुंबई, बंगळुरू आदी ठिकाणी स्थायिक झाले. सोशल मीडियातून पुन्हा वर्गमित्र, मैत्रिणींचा संपर्क झाला. व्हॉट्स ॲपवर सर्व एकत्र आले. गप्पा रंगू लागल्या. आठवणी ताज्या झाल्या. मग पुन्हा भेटून धमाल करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. आणखी सवंगड्यांचे क्रमांक मिळवले. त्यांनाही ग्रूपमध्ये ॲड केले. सर्वानुमते दिवस ठरला. स्थानिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. त्यावेळचे अनेक शिक्षक निवृत्त झालेले. काही शहराबाहेर, तर काही शहरातच होते. त्यांचा पत्ता शोधला, संपर्क केला, आमंत्रण दिले. ठरल्यादिवशी सर्व एकत्र आले.

  शाळेतच छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक अरूण वेताळ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालय समितीचे सदस्य बाळासाहेब ओझा, सोपान सानप, दिनकर पोखरकर, सत्वशील शहाणे, मंदाकिनी पिसोळकर, बेबीनंदा भिंगारदिवे, शीला पाटील, सुमन शहाणे, मुळे, स्मिता निर्मळ, सुनंदा खर्डे, शिरीष सूर्यवंशी, दिलीप जासूद, राजेंद्र धोंगडे, माधव गायकवाड, मनोज वैराळ, सत्यनाथ शेळके आदींसोबत सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला. अनेकांनी आठवणी सांगितल्या. शिक्षकांनीही आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. नंतर सर्व माजी विद्यार्थी आपल्या पूर्वीच्या बेंचवर वर्गात बसले. पुन्हा तोच धिंगाणा घालत आठवणींना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व्यंगचित्रकार रवी भागवत यांनी केले. प्रास्ताविक मानसी कुलकर्णी यांनी केले. यावेळी अभिजित रासकर, प्रशांत रंजनकर, संदीप ढवळे, बबन टिक्कल, अर्चना मत्सागर, शीतल शिंदे, शितल कुवर, सविता गरूटे आदींसह अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विरेश लबडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्विततेसाठी सचिन गायकवाड, किशोर फरगडे, श्रीकांत दहिमीवाळ, हरविंदर सिद्धू, अविनाश कुदळे, अशोक यादव, राहुल शहाणे आदींसह सर्व विद्यार्थी प्रयत्नशील होते.

  चित्ररूपी 'गुरूदक्षिणा'
  तब्बल २२ वर्षांनंतर प्रथमच गुरूजणांना भेटण्याचा योग येणार असल्याने त्यांचा सन्मान करण्याचा सर्वानुमते ठरविण्यात आले. रवी भागवत यांनी काढलेले प्रत्येक शिक्षकाचे रेखाचित्र भेट देण्यात आले. आपल्या रेखाचित्राच्या माध्यमातून मिळालेली गुरूदक्षिणा पाहून गुरूजणांचा आनंद द्विगुणित झाला.

Trending