आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता पॉलिसी घेण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही; घरबसल्या व्हॉट्सअॅपवर पॉलिसी घेवून भरा प्रीमियम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला विमा घ्यायचा आहे परंतू तुम्ही कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्यास कंटाळले आहात. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विमा कंपनी एक्सा लाइफ इंश्युरेंस (Bharti AXA Life Insurance)ने ग्राहकांसाठी नविन सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर घरबसल्या विमा पॉलिसी घेवू शकतात.

 
व्हॉट्सअॅपवर विमा घेण्याचा नविन पर्याय
भारती एक्सा इंश्युरेंस कंपनीने अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, कंपनीने ग्राहकांसाठी विमा खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा नविन पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे ग्राहक घरबसल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विमा खरेदी, प्रिमियम भरु शकतात.

 

भारती एक्सा इंश्युरेंस कंपनीने ग्राहकांसाठी खुले केले अनेक पर्याय
इंश्युरेंस कंपनीकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आता ग्राहक भारती एक्सा इंश्युरेंस कंपनीच्या कोणत्याही शाखेतून, कस्टमर केयर सेंटरमधून किंवा थेट संपर्क साधून कंपनीच्या सुविधांचा लाभ घेवू शकतो. त्यासाठी कंपनीने डायनेमिक पोर्टल आणि चॅटबॉक्ससुद्धा तयार केले आहे. याव्यतिरिक्त तुम्ही व्हॉट्सअॅपवरुनसुद्धा सुविधांचा लाभ घेवू शकतात.