आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहटा येथे वेदमंत्रोच्चारात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- नवरात्राेत्सवानिमित्त मोहटा देवस्थानमध्ये वेदमंत्रोचारांसह देवीच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. हजारो भाविक रात्रभर अनवाणी पायाने चालत गडावर पोहोचले. 


दिवसभर शेकडो मशाली देवीसमोर पेटवून राज्यभर मार्गस्थ झाल्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते व सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा, अभिषेक करण्यात आला. नारायण देव बाबा देव, राजू देव, भूषण देव यांनी पौराेहित्य केले. सुमारे दोन हजार महिला भाविक पहिल्या दिवशी घटी बसण्यासाठी दाखल झाल्या. तिसऱ्या माळेपर्यंत विविध गावच्या भाविक महिला दाखल होतील. अष्टमी होमापर्यंत त्यांचा मुक्काम गडावर असतो. सकाळी मोहटे गावातून देवी गडापर्यंत वाजत गाजत देवीचा मुखवटा व सुवर्ण अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली. 


रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम व दांडिया पथक, श्री त्रिलोक जैन विद्यालयाचे बॅण्ड पथक, महिला भाविकांचे कलश पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने लोक जागृती, संपर्क व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष दालनाचे उद्््घाटन देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोक भिल्लारे, उद्योजक आबा नागरगोजे, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक केशव घोळवे, शैला मुळीक, विधिसेवा प्राधिकरणचे जिल्हा सचिव पद्माकर केस्तीकर, योगेश हळगावकर, रतन येणारे, उद्योजक विठ्ठल मंत्री, नगरसेविका दीपाली बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...