आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना, कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटकलशाची मिरवणूक काढण्यात आली. 

 

तुळजाभवानी देवीची आजची अलंकार पुजा 

आजपासुन सुरू होणा-या शारदिय नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,सुख, शांती,समाधान लाभो हिच तुळजाभवानी चरणी मनापासुन प्रार्थना !!😊 #आजचे_दर्शन_तुळजापूर 🙏#नवरात्रि #Navaratri #Navratri2018 #Tuljapur pic.twitter.com/g7KFyrYlCl

— Somnath Ghodake (@GhodakeSomnath) October 10, 2018

 

 

राज्यभरात उत्साह

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह शारदीय नवरात्रोत्सवात संपूर्ण राज्यामध्ये घरोघरीही घटस्थापना होत असते. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरालाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खास सजावट करण्यात आली आहे. कोल्हापुरात नवरात्रोत्सवानिमित्ता तोफेची सलामीही देण्यात आली. दुसरीकडे पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात तुळशीची आरास करण्यात आली आहे. तर रुख्मिणी मंदिरामध्ये सुवासिक पांढऱ्या फुलांची खास आरास करण्यात आली आहे.  

बातम्या आणखी आहेत...