आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी आंदोलकांची दगडफेक; जमावाच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझीपूर- उत्तर प्रदेशातील गाझीपुरात शनिवारी आरक्षणासाठी चक्का जाम करणाऱ्या निषाद समाजाच्या लोकांनी केलेल्या दगडफेकीत एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. बुलंदशहरमध्ये इन्स्पेक्टर सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येच्या २६ दिवसांतच जमावाच्या हल्ल्यात पोलिसाच्या मृत्यू हाेण्याची ही दुसरी घटना आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाझीपूर दौऱ्यामुळे काॅन्स्टेबल सुरेश वत्स व्हीव्हीआयपी ड्युटीवर होते. ते परतत असताना नाेनहरा ठाण्यातील कठवा माेड पाेलिस चाैकीजवळ एका पुलावर निषाद समाजाच्या लोकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्का जाम केला होता. कंट्राेल रूमने ही कोंडी फोडण्याचा आदेश दिला. लोकांना पांगवण्याचा प्रयत्न करत असताना निदर्शकांनी पोलिसांवरच दगड-विटांचा मारा केला. यात दोन-तीन पोलिस जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात दाखल करेपर्यंत कॉन्स्टेबल वत्स यांची प्राणज्योत मावळली. अाराेपींना तत्काळ अटक करण्याचे अादेश मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांनी जिल्हा न्यायदंडाधिकारी अाणि एसएसपीला दिले. वत्स यांच्या पत्नीला ४० लाख आणि आई-वडिलांना १० लाखांची मदत देण्याची घोषणाही केली.

बातम्या आणखी आहेत...