आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१५० महिलांचा एकाच वेळी घुमर करण्याचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुष्कर  - आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात घुमर नृत्य करून नवा इतिहास रचला आहे. मेळा मैदानात गुरुवारी राजस्थानी वेषातील २ हजार १५० महिलांनी एकाचवेळी लोकनृत्य सादर करून घुमर नृत्याचा नवा विक्रम केला आहे. पुष्करच्या मरुभूमीत आयोजित या लोकनृत्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद केली आहे. जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांना या अनोख्या व यशस्वी लोकनृत्याच्या आयोजनासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ऐतिहासिक घुमर नृत्याची तयारी सुमारे एक महिन्यापासून सुरू होती. प्रशासनाकडून गोपनीयता बाळगण्यात आली होती. नृत्याची कोरियोग्राफी स्मिता भार्गव यांनी केली. त्यांनी नृत्यात भाग घेणाऱ्या महिलांना व्हिडिओ पाठवून स्टेप शिकवल्या. 
 

जोधपूरचा विक्रम मोडला
पुष्करमध्ये  २ हजार १५० महिलांनी घुमर नृत्य करुन जोधपूरचा विक्रम मोडला. याआधी १७५० महिलांनी जोधपूरमध्ये आयोजित घुमर नृत्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होती