आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ghost Stories Will Knock Midnight, Karan Johar Shared Video And Told That It Will Be Released On 1st January 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्यरात्री रिलीज होणार घोस्ट स्टाेरीज, करण जोहरने व्हिडिओ शेअर करुन सांगितली तारीख

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी 'घोस्ट स्टोरीज' या चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली आहे. हा चित्रपट 1 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट एक दोन नव्हे तर चार दिग्दर्शकांनी एकत्रित येऊन दिग्दर्शित केला आहे. करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी एक व्हिडिओ शेअर करुन चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली. या व्हिडिओत ते चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहेत.

4 कथांचा कोलाज
'घोस्ट स्टोरीज'मध्ये चार वेगवेगळ्या स्टोरीज चित्रीत केल्या गेल्या आहेत. या चार स्टोरीज अनुराग, झोया, दिबाकर आणि करण यांनी दिग्दर्शित केल्या. या चार दिग्दर्शकांनी यापूर्वी लस्ट स्टोरीज बनवला होता. व्हिडिओत करण म्हणतोय की, आता मी बिग फॅट वेडिंग्स पुर्वीच्या दृष्टीकोनातून बघू शकणार नाही. तर अनुराग म्हणतोय की, चिमण्यांचा आवाज आता तुम्हाला पुर्वीसारखा सुरेल वाटणार नाही. करणने अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक फोटो शेअर केला असून त्यात तिच्या चेह-यावरील भीतचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत.

झोयाच्या कथेत जान्हवी कपूर...
या चित्रपटातील एक कथेत अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. जान्हवीने या चित्रपटातील तिचा एक फोटो शेअर केला. तर एका व्हिडिओत तिने झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचे सांगितले. जान्हवीसोबत 'गली बॉय' फेम अभिनेता विजय वर्मा झळकणार आहे.