आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: ऑफिसमध्ये सुरू होती अधिकाऱ्यांची बैठक, अचानक छतावरून पडला 5 फुटांचा अजगर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ चीनच्या नॅनिंग शहरातील एका बँकिंग कार्यालयात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. बँक अधिकारी आणि कर्मचारी काँफ्रन्स रुममध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करत होते. त्याचवेळी छतावरून एक जिवंत अजगर खाली पडला. अजगर पाहताच कार्यालयात पळा-पळ सुरू झाली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जितके कर्मचारी घाबरले तितकाच तो अजगर सुद्धा घाबरला होता. खाली पडताच तो सरपटत निघून गेला. 


यानंतर बँकेत सर्पमित्राला बोलावण्यात आले. काही मिनिटांतच सर्पमित्राने अजगराला यशस्वीरित्या पकडले. 5 किलो वजनी असलेले हे अजगर 5 फुटांपेक्षा लांब होते. परंतु, ते छतावर कसे पोहोचले हे अद्याप समोर आले नाही. काहींच्या मते, कार्यालयातील सेंट्रल एसीमध्ये हे सर्प लपले असावे. तसेच सीलिंगमध्ये घुसल्यानंतर सीलिंगचे बोर्ड त्याचा भार सहन करू शकले नाही आणि अजगर खाली पडला. या घटनेत कुठल्याही दुखापतीचे वृत्त नाही.

बातम्या आणखी आहेत...