Home | Business | Gadget | gift ideas for fathers day

"फादर्स डे'' ला हे सहा गिफ्ट देऊन वडिलांना बनवा हायटेक, अनेक प्रकारे येतील उपयोगी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 15, 2019, 02:32 PM IST

आपल्या वडिलांना या खास गोष्टी गिफ्ट करून साजरा करा फादर्स डे

 • gift ideas for fathers day

  गॅजेट डेस्क- या "फादर्स डे' निमित्त आपल्या वडिलांना काही तरी असे गिफ्ट द्या, जे कपाटात न ठेवता त्यांच्या उपयोगी पडेल.


  रेट्रो ब्लूटूथ आर्टिसन की-बोर्ड
  एजिओच्या या ब्लूटूथ की-बोर्डला जुन्या टायपराइटरसारखा लुक देण्यात आला आहे. त्यामुळे बटनाच्या खाली मॅकेनिकल स्विच लावण्यात आले असून लेदर आणि लाकडी टॉप प्लेट देण्यात आली आहे. तसेच, याची ऊंचीसुद्धा आपल्या सुविधेनुसार, बदलता येते आणि एकदा चार्ज केल्यानंतर बॅकलाईटसोबत हा टायपरायटर दोन महिने चालतो.

  किंमत -15000 रु. (amazon.com)

  मेडिटेशन बँड
  जर आपल्या वडिलांना तणावापासून दूर ठेवायचे असेल, तर हा स्मार्ट उपकरण खूप फायदेशीर आहे. याची बॅटरी सतत पाच तास काम करते. हा स्मार्ट बँड एका अॅपद्वारे जोडलेला असतो आणि प्रत्येक युझरचा वेगवेगळा डेटा गोळा करतो.

  किंमत 10,000 रु. (choosemuse.com)

  सेलफोन सॅनेटायझर
  फोनसोप त्या लोकांसाठी आहे जे आपला फोन नेहमी स्वच्छ ठेवायला आवडते. यु.व्ही. लाइटद्वारे हा फोनवरील संपूर्ण बॅक्टरिया नष्ट करतो. याचा आपण स्मार्टवॉच, हेडफोन, क्रेडिट कार्ड आणि चावी साफ करण्यासाठी उपयोग करू शकतो.

  किंमत 4200 रु. (amazon.com)

  लेदर हेडफोन्स
  एमएच 40 लेदर ओव्हर-ईअर हेडफोन्स प्रत्येक वडिलांना अवडेल असे हे उपकरण आहे. यामध्ये हायटेक मटेरिअल वापरले असून बाहेरचे पॅनेल स्टेनलेस स्टीलचे आहेत. मास्टर अँड डायनॅमिक पासून तयार करण्यात आलेले या हेडफोनमध्ये बॅकग्राउंड नॉइस ब्लॉक होत असल्यामुळे क्रिस्टल क्लेअर आवाज ऐकू येतो.

  किंमत - 58000 रु. (mrporter.com)

  डिजिटल पेपर
  या उपकरणामुळे प्रत्येक वडिलांना लिहिणे अगदी सोपे होईल, विशेष त्या वडिलांना ज्यांना टायपिंगऐवजी लिहायला जास्त आवडते. सोनीचे हे उत्पादन अतिशय पातळ असून अगदी पेपरसारखे दिसते. एका अॅपद्वारे यातील नोट्स कुठेही पाठवता येतात.

  किंमत 15000 रु. (amazon.com)


  होम वाय-फाय सिस्टम
  आपल्या वडिलांचे सर्व स्मार्ट गॅझेट्स वाय-फायवर अवलंबून असतात. पण अनेक वेळा या वायफायच्या नेटवर्कध्ये अडथळा येतो. पण आता 'वाय-फाय एक्स्टेंडिंग बीकन्स' यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे जुन्या वाय-फाय रूटर, वाय-फाय एक्सटेंडर आणि इंटरनेट बूस्टर ला रिप्लेस होतात.

  किंमत- 4200 रु. (amazon.com)

 • gift ideas for fathers day
 • gift ideas for fathers day
 • gift ideas for fathers day
 • gift ideas for fathers day
 • gift ideas for fathers day
 • gift ideas for fathers day

Trending