आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - तुमची पत्नी नोकरी करत नसेल तरीही तुम्ही त्यांच्यासाठी रेग्युलर इन्कमची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्हाला पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टीम म्हणजेच (NPS) अकाउंट उघडावे लागेल. NPS अकाउंट तुमच्या पत्नीला वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर एकूण जमा रक्कम देईल. या व्यतिरिक्त पत्नीला प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात रेग्युलर इन्कमही होईल. एनपीएस अकाउंटसोबतच तुम्ही हेही निश्चित करू शकता की तुमच्या पत्नीला महिन्याला किती पेन्शन मिळेल. यामुळे तुमची पत्नी वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणावरही पैशांसाठी अवलंबून राहणार नाही.
उघडावे एनपीएस अकाउंट
तुम्ही तुमच्या पत्नीचे न्यू पेन्शन सिस्टीम म्हणजे एनपीएस अकाउंट उघडू शकता. या अकाउंटमध्ये तुम्ही तुमच्या सुविधेनुसार प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करू शकता. तुम्ही 1000 रुपयांपासूनही पत्नीच्या नावावर एनपीएस अकाउंट उघडू शकता. वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एनपीएस अकाउंट मॅच्युअर होते. नवीन नियमानुसार तुम्ही तुमच्या पत्नीचे NPS अकाउंट त्यांच्या वयाच्या 65 वर्षांपर्यंतही चालवू शकता.
5,000 रुपये मासिक गुंतवणुकीने जमा होईल 1 कोटी 14 लाख रुपये रक्कम
उदाहरण स्वरूपात सांगायचे झाल्यास, पत्नीचे वय सध्या 30 वर्षांचे आहे आणि तुम्ही पत्नीच्या एनपीएस अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करत आहात. या गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षाला तुम्हाला 10 टक्के रिटर्न मिळत असेल तर 60 वर्षानंतर पत्नीच्या अकाउंटमध्ये एकूण 1 कोटी 14 लाख रुपये जमा असतील. पत्नीला यामधील 45 लाख रुपये मिळतील. या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला 45 हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन त्यांना आयुष्यभर मिळत राहील.
नोट : गुंतवणुकीवर रिटर्न अंदाजी आहेत.
प्रोफेशनल फंड मॅनेजर करतात तुमच्या पैशांचे मॅनेजमेंट
एनपीएस केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम आहे. या स्कीममध्ये तुम्ही जे पैसे गुंतवणूक करणार आहेत त्याचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मॅनेजर करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सला याची जबाबदारी देतात. यामुळे एनपीएसमध्ये तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. परंतु या स्कीम अंतर्गत तुम्ही जो पैसा इन्व्हेस्ट करत आहेत त्यावर रिटर्नची गॅरंटी नसते. फायनेन्शिअल प्लॅनर तारेश भाटिया यांच्यानुसार एनपीएसने सुरुवातीपासून आतापर्यंत वर्षाला 10 ते 11 टक्के रिटर्न दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.