Gig Economy / गिग इकाॅनाॅमी बनणार राेजगाराचे नवे माध्यम, स्थिर नाेकरीऐवजी कामानुसार पेमेंट, २०२३ पर्यंत जगातील एक तृतीयांश मनुष्यबळ याचा भाग असेल

पूर्णवेळ कामाऐवजी टास्कवर आधारित जास्त उपलब्ध; ओला, उबर, स्विगी प्लॅटफॉर्मवर मिळतात संधी

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 27,2019 09:43:00 AM IST

नवी दिल्ली - आेला, उबरसारख्या प्लॅटफाॅर्मवर टॅक्सीचालक, झाेमॅटाे, फूडपांडा, स्विगीसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणारे लाेक, फायबरसारख्या प्लॅटफाॅर्मवर वेब डिझाइन करणारे व्वयावसायिक या सर्वांना आपल्या कामाच्या माेबदल्यात पैसे मिळतात. परंतु ते आेला, उबर, झाेमॅटाे, स्विगी किंवा फायबर यांचे कर्मचारी नसतात. जितके काम केले किंवा टास्क पूर्ण केले तर त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. राेजगाराच्या या यंत्रणेला गिग इकाॅनाॅमी म्हणतात.


सध्याची आकडेवारी बघता जगातील जवळपास २० टक्के मनुष्यबळ आजही गिग इकाॅनाॅमीच्या माध्यमातून आपली उपजीविका करत आहे. वर्ष २०२३ पर्यंत जगातील प्रत्येक तीनपैकी एक कर्मचारी गिग इकाॅनाॅमीचा एक भाग असेल. २०३५ पर्यंत ही संख्या ५० % पर्यंत जाईल. अमेरिकेतील ३६% मनुष्यबळ गिग इकाॅनाॅमीचा भाग
झाले आहे.

अमेरिकेचे ३६ % कर्मचारी गिग इकाॅनॉमीचा हिस्सा

गिग इकोनॉमी सध्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेत त्याचा उपयाेग जास्त हाेत आहे. गॅलपच्या अहवालानुसार अमेरिकेतील ३६ % कामगार गिग इकाॅनाॅमीचा भाग झाले आहेत. पुढील पाच वर्षात अमेरिकेचा ५० % कामगार गिग इकाॅनाॅमीच्या माध्यमातून राेजगार मिळवेल. येथील गिग इकाॅनाॅमीचे कामगाार १०० काेटी तास काम करत आहेत. युराेपमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती असल्याचे समाेर आले आहे.

गिग इकाॅनाॅमीचा ३० लाख काेटी डाॅलरवर जाणार

गिग इकाॅनाॅमीशी जाेडल्या जाणाऱ्या लाेकांची संख्या वाढण्याबराेबरच जगाच्या जीडीपीमध्येही त्याचा वाटा सातत्याने वाढत आहे. २०१८ मध्ये जगाची जीडीपी ८० लाख काेटी डाॅलर (जवळपास ५७२४ लाख काेटी रुपये) हाेती. यामध्ये गिग इकाॅनाॅमीचा वाटा ३० लाख काेटी डाॅलर (जवळपास २१४६ काेटी रुपये) हाेता. येणाऱ्या वर्षात यामध्ये आणखी वेगाने वाढ हाेण्याचा अंदाज आहे.


कर्मचाऱ्यांना हाेणारे फायदे

> कामाचे विविध प्रकार आणि जास्त संधी उपलब्ध
> आपली इच्छा आणि वेळेनुसार काम
> कार्यालयीन वेळेच्या बंधनातून मुक्ती


कर्मचाऱ्यांचे हाेणारे नुकसान

> नाेकरीची सुरक्षितता नाही
> पीएफ, मेडिक्लेमसारख्या सुविधा नाहीत
> कामाच्या किमतीत चढ-उतार


कंपन्यांना होणारे फायदे

> कायम कर्मचारी ठेवण्याची गरज नाही
> कार्यालयाच्या जागेचा खर्च वाचताे
> कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरील खर्चात

कंपन्यांना हाेणारे नुकसान
> विश्वासू कर्मचाऱ्यांचा अभाव
> मनुष्यबळावरील नियंत्रण कमी हाेते
> नियम ठरतात अडचणीचे


गिग इकाॅनाॅमीमध्ये ही कामे

कंटेंट रायटिंग, डिझायनिंग, साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, ड्रायव्हिंग, डिलिव्हरी, मार्केटिंग, मल्टीमीडिया, थेरपिस्ट, वेब डेव्हलपर, डेटा एंट्री, हाऊसकीपिंग, बेबी सीटिंग


२०१८ मध्ये ७० % कंपन्यांनी केला गिग कर्मचाऱ्यांचा वापर

> नोबल हाऊस कन्सल्टिंगच्या अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात ७० % कंपन्यांनी काेणत्या ना काेणत्या रुपाने गिग कर्मचाऱ्यांचा वापर केला
> देशातील गिग कामगारांमध्ये पुरुष, महिलांचा वाटा ५०-५० % आहे. पारंपरिक नाेकऱ्यांमध्ये पुरुष ७० % आहेत.
> ४५ % एचआर प्रमुख म्हणाले काैशल्यासाठी गिग कर्मचाऱ्यांचा वापर

इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे या नाेकरीच्या संधी वाढल्या

गिग इकाॅनाॅमीशी संबंधित राेजगार देणारे बहुतांश प्लॅटफाॅर्म इंटरनेटचा उपयाेग करतात. साधारणपणे ते स्मार्टफाेनवरून काम करतात. इंटरनेट आणि स्मार्टफाेनमुळे या राेजगाराच्या संधी वाढल्या. माेठ्या मध्यम शहरांमध्ये सेवा आहे. येणाऱ्या वर्षात ग्रामीण भागातही ती पाेहोचेल.

गिग इकोनॉमीचे काम देणारे प्लेटफॉर्म
ओला, उबर, स्विगी, झाेमॅटो, फूड पांडा, यूडेमी, फ्रीलान्सर, अॅमेझाॅन फ्लेक्स, पोस्टमेट्स, एअरबीएनबी, यूसी, फायव्हर

X
COMMENT