पाक पंतप्रधानांचे हेडलीशी संबंध? हेडलीच्या वडीलांच्या अंत्ययात्रेत सहभाग

agencies | Update - May 29, 2011, 04:12 PM IST

मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. हेडलीच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर गिलानी हे त्याच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी गेले होते, असा खुलासा हेडली याने केलाय.

  • gilani-headly

    शिकागो न्यायालयात हेडलीने सांगितले की 2010मध्ये त्याचे वडील सलीम गिलानी यांचे निधन झाले. त्यावेळी गिलानी त्याच्या घरी गेले होते. सलीम गिलानी यांच्या अंत्ययात्रेतही ते सहभागी झाले होते. सलीम हे कवी होते आणि रेडीओ पाकिस्तानचे माजी महासंचालकही होते. त्यांनी वॉशिंग्टन येथे पाकिस्तानी दुतावासात काम केले होते. तसेच हेडलीचा भाऊ दन्याल गिलानी हा पंतप्रधान पंतप्रधान कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो.

Trending