आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अद्रकामुळे शरीराला मिळते ऊब, होतात हे खास फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अद्रकात बरेच औषधीय गुण अाहेत. हिवाळ्यात याचा उपयोग केल्यामुळे शरीर गरम राहते आणि पचन आणि संसर्गासंबंधी आजारापासून बचाव होतो. अद्रकात प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, आयर्न कॅल्शियम आणि आयोडिनसारख्या तत्त्वांची मोठ्या प्रमाणात अाहेत. यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. प्रकृतीसाठी याचा उपयोग चांगला असतो. 


हाडांच्या बळकटीसाठी उपयोगी अद्रकाचे पाणी 
शरीराला बळकट बनवण्यासाठी आणि स्नायूंच्य दुखण्याला दूर करण्यासाठी अद्रकाचा औषध म्हणून वापर केला जातो. यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, आयर्न, झिंक, कॅल्शियम आणि बेटा कॅराटिनसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व तत्त्व सांध्याच्या बळकटीसाठी आणि स्नायू पिळदार बनवण्यासाठी मोठी भूमिका निभावतात. तसे पाहिले तर अद्रकाचे कोणत्याही स्वरूपातील सेवन हे फायदेशीर आहे. यात असणाऱ्या तत्त्वांच्या पूर्ण फायद्यासाठी अद्रकाच्या पाण्याचे सेवन करणे जास्त उपयोगी आहे. 


घरी असे बनवा हे पेय 
घरात अद्रकाचे पाणी बनवण्यासाठी दोन इंच ताजे अद्रक घ्या. याला िकसून घ्या. यात तीन कप पाणी आणि अर्धा लिंबू मिसळा. जेव्हा ते पूर्णपणे एकजीव होऊन त्याचा रस होईल तेव्हा त्यात दोन चमचे मध मिसळा. 


1. ऊर्जा मिळते 
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून सकाळी उठून अद्रकाचा चहा घ्यावा. अद्रकात थर्मोजेनिकचे गुण असतात. जे शरीराला गरम ठेवण्यासाठी मदत करतात. 


2. पचन जलद होते 
या ऋतूमध्ये नेहमी तळलेल्या आणि गोड पदार्थांचे जेवण जास्त खाण्यात येतात. म्हणून पचनशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. अद्रकातील गुण पचनप्रक्रियेला वेगवान बनवतात. जर पचनक्रिया चांगली असेल तर समस्याच निर्माण हाेत नाहीत. 


3. खोकला दूर होतो 
कोणत्याही प्रकारचा खोकला असू द्या अद्रकाच्या नियमित वापराने यावर नियंत्रण आणता येते. अद्रकाच्या रसात मध मिसळून त्याला गरम करून खोकला असणाऱ्या रुग्णाला दिवसातून दोन वेळेस दिल्यास खोकला दूर होतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर खास फायदे...

बातम्या आणखी आहेत...