आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपनीचा मालक जुगारात हरला 1000 कोटी रूपये, कंपनी गेली दिवाळखोरीत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीजिंग- चीनची स्मार्टफोन कंपनी जियोनी दिवाळखोरीत जाण्याची वेळ आली आहे. जियोनीचे चेयरमॅन लियु लिरॉनच्या जुगाराच्या सवयीमुळे ही वेळ आली आहे. अॅंड्रॉयड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार लिरॉनने 1008 कोटी रूपये(14.4 कोटी डॉलर) हारल्याचे कबूल केले आहे.


लिरॉनचा दावा- जुगारात कंपनीचे पैसे नाही लावले
चीनची वेबसाइट जेमियांच्या रिपोर्टनुसार जियोनी आपल्या सप्लायरला पैसे देऊ शकत नाहीयेत. त्यामुळे 20 सप्लायर कपंन्यानी  जियोनीला दिवाळखोर घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जियोनीचे चेयरमॅन लिरॉन यांचे म्हणने आहे की, त्यांनी जुगारात कंपनीच्या पैशांचा वापर केला नाहीये. जियोनीने एप्रिलमध्ये म्हणले होते की कंपनी भारतात या वर्षी 650 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...