आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांपासून खोलीत बंद केला होता वडिलांचा मृतदेह, समोर आले बंद करण्यामागचे धक्कादायक कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरिडीह (झारखंड) - शनिवारी सायंकाळी इंदिरा कॉलनीमध्ये 75 वर्षीय वृद्धाचा 6 महिने जूना मृतदेह सापडला आहे. विश्वनाथ प्रसाद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विश्वानाथ यांचा मुलगा प्रशांतकुमार सिन्हाने त्यांना तांत्रिक विद्येने पुर्नजिवीत करण्यासाठी त्यांचा मृतदेह स्वत:कडे ठेवला होता. एका खोलीत तो त्यांच्यावर तांत्रिक विद्या वापरुन त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. प्रशांतकुमार ने पोलिसांना सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून एका केमिकलच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाला सुरक्षित ठेवले होते. आणखी दोन वर्षांपर्यंत तो त्याच्या वडिलांच्या मृतदेहाला ठेवू शकतो. यामुळे त्याला मृतदेह परत देण्यात यावा. मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले तर त्यांच्या आठवणी संपुष्टात येतील. 

 

वडिलांच्या मृतदेहाला आणखी 2 वर्षे सुरक्षित ठेवण्याची इच्छा होती.

> प्रशांतकुमार वडिलांच्या मृतदेहाला त्याला परत देण्याची पोलिसांकडे एकसारखी विनवणी करत होता. तो वडिलांशिवाय राहू शकत नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी प्रशांतला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यासोबतच पोलिसांनी प्रशांतची आई आणि त्याच्या दोन बहिणींची चौकशी केली. प्रशांतने वडिलांवर खूप प्रेम असल्याचा दावा केला आहे. 

 

पोस्टमार्टमसाठी धनबादला पाठवला मृतदेह
> पोलिसांनी प्रशांतची विचारपूस केल्यानंतर सुटका केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. तर पोलिसांनी विश्वनाथ यांच्या सडलेल्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पीएमसीएच धनबाद येथे पाठविले आहे. डीएसपी नवीन कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतदेह हालत अति खराब झाल्यामुळे त्याचे पोस्टमार्टम गिरिडीहमध्ये करणे शक्य नव्हते त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पीएमसीएच धनबाद येथे पाठविण्यात आला आहे. 

 

तंत्र-मंत्रासाठी रूममध्ये लावला होता नोटीस बोर्ड
> पोलिसांनी प्रशांतच्या खोलीतून एक नोटिस बोर्ड ताब्यात घेतला आहे. बोर्डाकडे पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, प्रशांत वडिलांच्या शरीरावर तंत्र-मंत्राच्या सहाय्याने संसोधन करत होता. त्या बोर्डावर काळाजादू, मारी मरवाई, संविधान शून्य, देव-देवता, शुभ विवाह, संपूर्ण धन संपत्ती, प्लानिंग अॅक्शन सारखे असंख्य शब्द लिहीले होते. नोटीस बोर्डावर अशा काही गोष्टी लिहील्या होत्या त्यांचा सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी काहीही संबंध नव्हता.

 

बातम्या आणखी आहेत...