आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा नुकसान पाहणीचा, चर्चा मात्र सत्ता स्थापनेचीच; अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ब्र शब्दही नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ओला दुष्काळ अर्थात अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान पाहणीच्या  दौऱ्याची सुरुवात सत्तास्थापनेच्या चर्चेनेच झाली. टीकेची झोड उठल्यानंतर 6 दिवस विलंबाने नुकसान पाहणीसाठी आलेल्या महाजन यांनी सुरुवातीला ओला दुष्काळाच्या संदर्भात चर्चा न करता सरळ सत्तास्थापनेच्या बाबतच विचार करत असल्याचे विश्रामगृह येथे पत्रकारांशी झालेल्या संवादात दिसून आले. 

सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेसोबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. आम्हाला कुणालाही त्यासंदर्भात बोलण्याचे स्पष्ट सूचना नाहीत.  परंतु नऊ तारखेपर्यंत सत्ता स्थापनेचा मुहूर्त असल्याने त्यादरम्यान नक्कीच मार्ग निघेल. असे त्यांनी स्पष्ट केले. पण शेतकरी नुकसानी बाबत एक शब्दही काढला नाही.
 
दरम्यान शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. या प्रकियेत कुणीही बोलू नये असे वरिष्ठ यांचे आदेश आहेत. सरकार स्थापनेसाठी 9 तारखेपर्यंत मुहूर्त आहे. लवकरच त्याबाबाबत निर्णय होईल असे महाजन म्हणाले. 
 
 

बातम्या आणखी आहेत...