आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंपाठाेपाठ गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, जळगावात अभिनंदनाचे लागले बॅनर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मोदींच्या विश्वासातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांचे विश्वासू जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत. किंबहुना, आता एकनाथ खडसेंपाठाेपाठ मंत्री महाजन जळगावात बॅनरवर मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत.


पंतप्रधान मोदींना केंद्रात रिक्त हाेणाऱ्या अरुण जेटलींच्या जागी अनुभवी सहकाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत माेदी फडणवीसांच्या नावाचा विचार करू शकतात. त्यामुळे फडणवीसांच्या विश्वासातील सहकाऱ्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या फडणवीस अत्यंत निकटवर्तीय म्हणून महाजनांचे नाव घेतले जाते. त्यामुळे महाजनांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते, असा विश्वास त्यांचे जळगावातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्याच जाेरावर कार्यकर्त्यांनी बुधवारी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमाेर भले मोठे बॅनर लावले. त्यावर मंत्री महाजन यांना शुभेच्छा देत त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. जळगावात लावलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...